होय मी येतोय 10 दिवसांनी परतून जातोय

नवचैतन्य टाईम्स वाई प्रतिनिधी(सौ.सरस्वती वाशिवले)–
होय मी येतोय
10 दिवसांनी परतून जातोय

मी शाळा,मंदीर,घरात राहतोय,
7 दिवसानंतर पाण्याच्या तळाशी मी निपश्चितपणे पडून राहतो,

आज मला पीयोपीचा बनवतोय
आणि ‘जल प्रदूषण ‘ थांबवा म्हणून बॅनर लावतोय,

मला मंडपामध्ये बसवतोय ,
डिजे लावून ,दारू पिऊन डान्स काय करतोय , पापाचा घडा स्वतःच भरतोय ,
ध्वनि प्रदूषण काय करतोय
माझ्या नावा खाली धर्माचा बाजार काय मांडतोय

मंदिरात झोपायला जातोय’ पत्त्याच्या डावात रात्रभर उजडतोय,

आता मला खुप त्रास होतोय,
माझ्या व्यथा मी मांडतोय,
गेले कित्येक वर्ष झालेय ,
हे मी सहन करतोय,
होय मी गणपती बोलतोय!!!
या सर्वाची मी जाणीव करुन देतोय,
होय मी गणपती बोलतोय!!!
बालकवी- रोशन ज्ञानदेव वाशिवले.
इयत्ता-7वी
ज्ञानदिप इंग्लिश मिडीयम स्कूल वाई पसरणी.

error: Content is protected !!