कवठेमहांकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यावर गणेशाचे मोठ्या उत्साहात आगमन
नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)-गणपती बाप्पा मोरया, मंगल मुर्ती मोरया’च्या गजरात व पारंपरिक वाद्यांच्या निनादात तसेच क्षफटाक्यांच्या अतिषबाजीत कवठेमहांकाळसह तालुक्याच्या घाटमाथ्यावर सर्वांचेच आराध्य दैवत समजल्या जाणाऱ्या गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षे नंतर यावर्षी घाटमाथ्यावरील घाटनांद्रे,तिसंगी,वाघोली,गर्जेवाडी जाखापूर ,कुंडलापूर,कुची व परिसरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होताना दिसत आहे.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व घरगुती गणेशाचे पारंपरिक वाद्यांच्या गजरात आगमन झाले.त्यानंतर गणेश मूर्तीची विधीवत व धार्मिक पद्धतीने मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली.गेली दोनतीन दिवसा पासूनच बाजारपेठत गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याची दुकाने सजलेली दिसत होती.विविध सार्वजनिक मंडळाच्या वतीनेही आकर्षक सजावटी केल्याअसुन विविध देखाव्याचे व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचेही नियोजन केल्याचे दिसून येत आहे.काल प्रतिष्ठापनेच्या दिवशी बाजारपेठत गणपतीसह सजावटीसाठी लागणार्या साहित्य खरेदी साठीची मोठी गर्दी दिसत होती.यावेळी आबाल वृध्दासह सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहात होता.