दुधगाव बंधाऱ्याची दुरावस्था आणि शेतकऱ्यांना शेतीसाठीच्या पाण्याची भेडसावत असणारी समस्या

नवचैतन्य टाईम्स महाबळेश्वर प्रतिनिधी(डॉ.कुलदिप यादव)महाबळेश्वर तालुका मौजे दुधगाव सोसायटी येथे अंदाजे दहा ते बारा वर्षांपूर्वी येथील शेतीतळीचा विकास व्हावा म्हणून पंचक्रोशीच्या मध्यवर्ती ठिकाणी प्लेट सिस्टीम बंधारा अंदाजे दहा लाख रुपये खर्चून शासनातर्फे बांधण्यात आला होता.परंतु मागील वर्षाच्या अतिवृष्टीमध्ये सदर जीर्ण झालेल्या बंधारयाच्या भिंती आणि प्लेट्स वाहून गेल्या आणि त्यामुळे या परिसरातील शेतीसाठी पाण्याचा परत प्रश्न निर्माण झाला आहे.त्याचबरोबर चतुरबेट या गावचा मुख्य पुल आणि त्याला पर्यायी म्हणुन कच्चा तात्पुरता तयार केलेला साकव वाहुन गेल्याने चतुरबेट गावी जाण्यासाठी या बंधाराचा वापर केला जायचा यावर्षी त्यावर लोखंडी अँगल टाकून प्रशासनाने तयार केलेला तात्पुरता पत्र्याचा रस्ता सुद्धा वाहून गेलेला आहे.त्यानंतर ग्रामस्थांनी आता स्व:खर्चाने परत त्याची डागडुजी करुन जाण्यायेण्याची वाट चालू केलेली आहे.परंतु शेतीसाठी आणि उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसाच शेतकऱ्यांना आणि या भागातील जनतेला भेडसावत आहेच.तरी शासनातर्फे या जागी कोल्हापूर टाईपचा स्वयं नियंत्रित बंधारा किंवा मिनी धरण व्हावे की ज्यायोगे या भागातील शेतीसाठी व ग्रामीण पर्यटनसाठी सुद्धा त्याची उपयुक्तता वाढेल अशी पंचक्रोशीतर्फे मागणी आणि ठराव पंचक्रोशीच्या मिटिंगमध्ये करण्यात आलेला आहे.अशी माहिती डॉक्टर कुलदिप यादव यांनी पंचक्रोशीच्या वतीने देण्यात आली आहे.

error: Content is protected !!