कर्नाटकाचे विद्यमान मंत्री उमेश कत्ती यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन
नवचैतन्य टाईम्स जत (प्रतिनिधी) कर्नाटकाचे राज्याचे मुख्यमंत्री एस्.आर्.बोम्माई यांच्या मंत्री मंडळात (भाजपा सरकार) वन आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री असलेले उमेश कत्ती (वय ६१) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. रात्री 10.30 च्या सुमारास उमेश कत्ती घरी कोसळले आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.बंगळूरच्या डॉलर्स कॉलनीत उमेश कत्ती यांना हृदयविकाराचा झटका आला.त्यांना एम.एस. रामय्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार करण्यात आले. इमर्जन्सी युनिटमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू होते.हे वृत्त समजताच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि अनेक मंत्र्यांनी रुग्णालयात धाव घेतली. कत्ती यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यातच त्यांचे रात्री साडे अकराच्या सुमारास निधन झाले.बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी विधानसभा मतदारसंघातून ते आठ वेळा निवडून आलेले ते ज्येष्ठ आमदार होते. 1983 मध्ये त्यांचे वडिल विश्वनाथ यांच्या निधनानंतर, त्यांनी अगदी लहान वयात पोटनिवडणूक जिंकली आणि ते आमदार म्हणून निवडून आले होते.ते स्वतंत्र उत्तर कर्नाटकचे पुरस्कर्ते होते…