कार्ला येथे अतिवृष्टी झाल्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे व परिसरातील नागरिकांचे हाल

नवचैतन्य टाईम्स उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी(आशा वाघ)कार्ला : दि. 07 रोजी सकाळी 5 ते 8 यावेळी तुळजापूर तालुक्यातील मौजे कार्ला या गावात अतिवृष्टी झाल्यामुळे कार्ला गावाचा संपर्क तुटला असून, कार्ला तांडा ते कार्ला जाणाऱ्या येणारे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत ,तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचेही प्रचंड हाल होत आहेत..त्याच बरोबर खंडाळा ते कार्ला, कार्ला ते उंडरगाव, व कार्ला ते सलगरा या गावांचा संपर्क सुद्धा तुटला आहे. आणि सोयाबीन पिकाचे खूप मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरीही अडचणीत आला आहे. जे नागरिक रोजी रोटी साठी व मजुरी करण्यासाठी जातात, त्यांना रस्ता नसल्यामुळे त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे.कार्ला ते कार्ला तांडा हा रस्ता नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. तरी ग्रामस्थांची एक मागणी आहे.कार्ला येथे लवकरात लवकर रस्ता किंवा पूल बांधण्यात यावा. व शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली..

error: Content is protected !!