जत तहसील कार्यालय अंतर्गत येणाऱ्या निवडणूक विभागाकडून मतदार यादी आधार लिंक करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु

नवचैतन्य टाईम्स प्रतिनिधी जत (नजीरभाई चट्टरकी)-तालुक्यातील तहसील कार्यालय अंतर्गत येणाऱ्या निवडणूक विभागाकडून मतदार यादी आधार लिंक करण्याचे राष्ट्रीय काम जत तालुक्यात युद्ध पातळीवर सुरू आहे मतदार यादी आधार लिंक करण्याचे सर्वेक्षण वेळेत पूर्ण केल्याबद्दल तालुक्यातील कोंतेव बोबलाद येतील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बी.एल.ओ तथा जिल्हा परिषद मराठी शाळेचे आदर्श शिक्षक श्री मल्लिकार्जुन सुतार सर,यांचा जत चे लोकप्रिय तहसिलदार श्री जीवन बनसोडे साहेब व उपविभागीय अधिकारी श्री जोगेंद्र कट्यारे साहेब यांनी प्रशस्तीपत्र देवून सत्कार केला.या वेळी तहसिलदार व निवडणूक विभागातील कर्मचारी उपस्थित होते. संपूर्ण जत तालुक्यात अशा प्रकारचे काम व्हावे,अशी अपेक्षा मा.उपविगीय अधिकारी जोगेंद्र कटयारे यांनी व्यक्त केली.जत तालुक्यात आधार लिंकचे 100% टक्के काम करणारे ते पहिलेच शिक्षक आहेत. मा.प्रांताधिकारी यांनी आधार लिंकचे काम करणाऱ्या कर्मचारी टीमचेही अभिनंदन केले आहे.संपूर्ण सांगली जिल्ह्यात मतदार यादी आधार लिंक करण्याचे काम सुरू असून मतदारांनी 6 ब फॉर्म भरून मतदार मतदार यादीतील नाव आधार लिंक करून घ्यावे असे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!