लम्पी आजाराबाबत पशुपालकांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी -मा खा.शरद पवार

नवचैतन्य टाईम्स माण खटाव प्रतिनिधी(युवराज गायकवाड)देशातल्या विवीध राज्यांमध्ये लम्पी आजार वेगाने पसरत आहे.राज्यस्थानमध्ये हजारो जनावरे लम्पीमुळे दगावली आहेत.महाराष्र्टामध्ये पशुपालकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. व्यावसायीक दृष्टीकोनातून दुग्धव्यवसायासाठी हजारो गाई-म्हशींचे मुक्तगोठे,बंदिस्त पशुपालन केले जाते.त्याचबरोबर शेतीला जोडधंदा म्हणून ग्रामिण भागांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर गाई, म्हशी,बैलांचा वापर करतात.लम्पी आजार संसर्गजन्य आहे.त्यामुळे शेतकर्‍यांनी आणि पशुपालकांनी आपल्या जनावरांची योग्य काळजी घ्यावी असे आवाहन खा.शरद पवार यांनी केले.खातगुण ता.खटाव,जि.सातारा येथील देशी वंशाच्या खिल्लार गाई व बैलांचे संगोपक प्रभाकर जाधव व सुबोध जाधव यांच्या बारामती भेटीदरम्यान त्यांच्याबरोबर खा. शरद पवार यांनी संवाद साधला.लम्पी आजारामुळे अनेक जनावरे दगावण्याचा धोका आहे त्यामुळे पशुपालकांनी जनावरांचा विमा उतरवावा.त्याचबरोबर पशु संवर्धन विभागाच्या मार्गदर्शनाखाली जनावरांना लसीकरण करून घ्यावे जनावरांचा बाजार बंद करण्यात आला आहे,बैलगाडा शर्यतींना परवानगी बंद केली आहे त्यामुळे पशुपालकांनी प्रशासनालाही सहकार्य करावे.लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढला तर दुग्धव्यवसायाला मोठा फटकाबसेल त्यामुळे शेतकर्‍यांनी आपल्या जनावरांना काळजीपुर्वक जपून या संकटातून सावरण्याची गरज आहे असा सल्ला पवार यांनी दिला.खातगुण येथील जाधव कुटूंबियांनी जोपासलेल्या देशी वाणाच्या खिल्लार गाई,बैल, काल वडींचे फोटो शरद पवारांनी पाहीले.जनावरांची माहिती घेतली. विवीध प्रदर्शनांमध्ये बक्षिस मिळवलेल्या आणि बैलगाडा शर्यतींसाठी शिकावू बैलांचे पवारांनी विशेष कौतुक केले. यावेळी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे अध्यक्ष राजेंद्र पवार,निखील आण्णा घाडगे, हरीदास बर्गे आदी उपस्थीत होते.

error: Content is protected !!