तुळजापुर येथील लिट्ल फ्लॉवर्स शाळेत मराठवाडा मुक्ती संग्रामदिन मोठ्या उत्साहात साजरा
नवचैतन्य टाईम्स उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी(आशा वाघ)तुळजापूर : लिट्ल फ्लॉवर्स मराठी प्राथमिक शाळेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी ध्वजा रोहणाचा कार्यक्रम ज्ञान विकास शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माधवरावजी कुतवळ यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी संस्थेचे पदाधिकारी वसंतराव अमृतराव व बाळकृष्ण दीक्षित,लिटिल फ्लॉवर्स मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय पवार,माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक औदुंबर गव्हाणे, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका अनुराधा नाईक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख अरुणा कुंभार व संतोष शिंदे यांनी परिश्रम घेतले.