ऑल इंडिया लेबर्स एम्प्लॉईज युनियन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी ॲड.पंडीत गायकवाड यांची अभिनंदनीय निवड

नवचैतन्य टाईम्स प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)-अखिल भारतीय स्तरावर कामगार तसेच अधिकारी यांच्या हितासाठी काम करणाऱ्या “ऑल इंडिया लेबर्स एम्प्लॉईज युनियन “या संघटनेमध्ये ॲड.पंडीत गायकवाड यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.वाढते औद्योगीकरण,वाढते औद्योगिक क्षेत्रे तसेच सेवा क्षेत्र यांचे बदलते स्वरूप यामुळे कामगार व कर्मचारी यांच्या समस्या ही मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यांच्या समस्यांचे स्वरुपही विविध प्रकारचे असल्याचे दिसून येत आहे,या सर्वांचा विचार करून अखिल भारतीय पातळीवर “ऑल इंडिया लेबर्स एम्प्लॉईज युनियन “,कामगार व कर्मचारी यांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे.दिवंगत प्रकाश घाडगे यांनी स्थापन केलेल्या या संघटनेचे नेतृत्व सध्या जेष्ठ कामगार नेते श्री सागर प्रकाश घाडगे हे करीत असून दिवंगत प्रकाश घाडगे यांच्या प्रेरणेतून ते कामगार कल्याणसाठी अहोरात्र प्रयत्नशील आहेत.सदर संघटनेचे सल्लागार म्हणून एससी/एसटी आयोगाचे सदस्य माजी न्यायाधीश मा.सी.एल.थूल,माजी न्यायाधीश मा.अनिल वैद्य,किमान वेतन सल्लागार समिती(महाराष्ट्र राज्य)चे सदस्य डॉ.मा. रघुनाथ कुचिक तसेच भारतीय वायुसेनेचे निवृत्त ग्रुप कॅप्टन मा.राकेश नंदा आणि भारतीय सैन्य दलाचे निवृत्त लेफ्टनंट कर्नल मा.सुनील नरुला तसेच भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी मा.हरनाम सिंह अशी ज्येष्ठ व अनुभवी अधिकारी सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. ॲड.पंडीत गायकवाड हे शासकीय विधी महाविद्यालय,मुंबई येथील कायदे पदवीधर असून ते सध्या कराड येथील न्यायालयात विधीतज्ञ म्हणुन सेवा बजावीत आहेत.त्यांचे सामाजिक काम व कामगार संघटनेतील योगदान पाहता त्यांची “ऑल इंडिया लेबर्स एम्प्लॉईज युनियन” महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे सदर निवडी बद्दल राष्ट्रीय अध्यक्ष मा.सागर प्रकाश घाडगे आणि महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.नितीन काळे यांनी ॲड.गायकवाड यांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.तसेच कराड येथील बार असोसिएशन कडुन तसेच पंचक्रोशितुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!