कडेपुर येथील प्रा स्वातीताई चव्हाण यांना आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)-श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या आर्टस ॲन्ड कॉमर्स कॉलेज कडेपुरच्या भूगोल विभाग प्रमुख प्रा सौ स्वातीताई नामदेव चव्हाण याना २०२२ च्या आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यांच्या या यशाचे परिसरातून मोठे अभिनंदन केले जात आहे.सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या अविष्कार फाऊंडेशन इंडिया यांच्या वतीने डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून प्रा स्वाती चव्हाण यांनी आजवर शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेऊन सांगली येथील तुळनाड भवन येथे घेण्यात आलेल्या भरगच्च आश्या कार्यक्रमात पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरूण(आण्णा) लाड यांच्या शुभहस्ते व अविष्कार फाऊंडेशनचे संस्थापक संजय पवार,जेष्ठ साहित्यिक प्रा किसनराव कुराडे,प्राचार्य टी एस पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्राध्यापक स्वातीताई चव्हाण यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी आमदार अरुण लाड म्हणाले की पुरस्काराने आजवर केलेल्या कामाचा गौरव तर होतोच पण भावी कामासाठी उर्जाही मिळते.त्यामुळे या गोष्टीचे मोल खुप म्हत्वाचे व मोठे आसल्याचे सांगितले.यावेळी प्रा किसनराव कुराडे,प्राचार्य टी एस पाटील,संजय पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देताना प्रा स्वाती चव्हाण म्हणाल्या की आईवडीलांनी घालून दिलेल्या जिद्द,चिकाटी व परिश्रम या त्रिसूत्रीच्या आधारावरच माझे काम चालू असल्याने यशाचे सर्व श्रेय त्यांचे आसल्याचे सांगितले.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा स्वाती चव्हाण यांचे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे,सचिव शुभांगी गावडे,सहसचिव राजेंद्र शेजवळ सह मान्यवरांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!