!!आणि पिंडाला कावळा शिवला!!

नवचैतन्य टाईम्स वाई प्रतिनिधी(प्रा.संभाजी लावंड)-माझी आई दोन हजार सहाला दिर्घ आजाराने राहत्या घरी मरण पावली.मरण समयी तिचे वय शहा हात्तर वर्षाचे होते.शरिरयष्टी काटक व कृश होती.कपाळावर गोल रुपयाच्या नाण्याच्या आकारा एवढे लालभडक कुंकू उठुन दिसायचे .हिरव्यागार पात ळाचा पदर डोक्यावर घेतल्यानंतर ती देवी सारखी दिसायची.संपुर्ण शरिराला गौरवर्ण लाभल्यामुळे कपाळावरील उभी हिरवी शीर अगदी स्पष्ट दिसायची.ऊन वारा, पाऊसाला न जुमानता ती नारगवंडीतील शेतात वडीलां सोबत काम करायची.कष्ट कर ताना कुठे थांबायचे हे तिला माहीत नसायचे.शेतातील भुई मुगाची खणती असु दे किंवा ज्वारीचे भांगलन असुदे ती सतत कामच करायची.त्यामुळे तिचे दोन्ही हाताचे तळवे भेगाळलेले व रापलेले असायचे.माझ्या जन्मा अगोदर थोरली बहीण इंदुचा विवाह झाला होता.भाऊ नोकरी निमित्त पुण्यात असायचा. आम्ही भावंडे यमुना,प्रभा,मंगल व मी गावातील दोन खणाच्या कौलारु घरात रहायचो.चुलीतला धुर बाहेर जावा म्हणून मागच्या पाख्याला उंच भिंती लगत साने पाडलेले असायचे.दिवस मावळ तीकडे फिरला की, चौकोनी सान्यातुन दिवसांची किरणे घरात अप्सरेसारखी अलगत उतरायची. घर प्रकाशाने उजाळुन निघायचे. मंगल आणि मी त्या झरोक्यातील हवेत तरंगत असलेले कण पक डायचो पण ते हाती काहीच लागायचे नाही. आमचा हा खेळ पाहुन आई खुप हसायची. त्या प्रकाशात हाताची बोटे लाल भडक दिसायची.रात्री सर्वांची जेवणे आटोपल्यावर गावातील रात्र अधिकच गंभीर व उदास वाटायची.गावात लाईट नसायची. यमुनाने टाकलेल्या अंथरुणावर आम्ही भावंडे आईला बिलगून झोपायचो.चुलीच्या वरच्या बाजुला राॅकेल तेलाचा दिवा एक सारखा पाजळत असायचा.सर्वत्र निरामय शांतता पसरायची.सोपान काकाचा टिप्या नावाचं कुत्र आळीत एकसारख खेकसल्या सारख राहुन राहुन ओरडायच.त्याच्या आवाजाने मला झोप लागायची नाही.तेव्हा आई कष्ट करणाऱ्या हातांनी दिवा मालवुन टाकायची.आम्ही झोपावे म्हणुन त्या उघड्या सान्यातुन भांबड येते.आता झोपा लवकर नाही तर ती पोरांना खाऊन टाकील.आम्ही भावंडे अंधाराच्या पोटात अस्तित्व हरवुन झोपायचो.आई भल्या पहाटे आम्हाला जागे न करता दळण दळायला बसायची.घरातील वरुट्याने ठोकलेल्या खुंट्याला हात लावुन अवजड जाते ती सहज जोर लावून फिरवायची .जात्याच्या पात्याची घरघर विमानाच्या आवाजा सारखी सुरु व्हायची नेमकी ज्वारीची मुठ फिरत्या जात्याच्या तोंडामध्ये न अडखळता सोडा यची.निरक्षर असुन सुद्धा जात्या वर मौखीक व पारंपारिक कसल्या तरीओव्या म्हणायची.पांढरे शुभ्र पीठ जात्या तुन बाहेर उसवायचे. ते पीठ दिव्याच्या प्रकाशात सुध्दा ठळक दिसायचे.पायली दोन पायल्या दळण दिवस उगवणीला संपवायची.आणि जात्याची घरघर आपोआप थांबायची आम्ही चौघे भावंडे घरातच अंथरुणावर अर्धवट झोपेतअसायचो.दादा सकाळी लवकर उठायचे.घरातील मोठी घागर व कपडे घेऊन अंघोळीसाठी पाणवठ्यावर जायचे.टिपाडातुन पाण्याने भरलेली घागर घरातील रांजणावर पालथी करुन ठेवायचे.पाण्याचा रांजणातील धो धो पडत असल्या चा सुंदर आवाज आमच्या काना मध्ये कितीतरी वेळ रेंगाळत रहायचा. दादा विष्णु सहस्त्रनाम स्त्रोत्र तोंडाने म्हणायचे.आणि नेहमी ऐकल्यामुळे आमचे ते तोंडपाठ होऊन जायचे.नव दहा वाजताच्या सुमारास रघु कोळी, मुंजावर आळीचा अरुण,भिकु आवळे व रामा वडारी एकाएकी दादांना हाका मारत अंगणात यायचे. त्या सर्वांच्या हातात कर्वत,लहान मोठ्या कुऱ्हाडी,व त्यांना धार लावणारे साहित्य एका पिशवीत आणायचे.दादा अंगणात यायचे कर्वत,कुऱ्हाडीला कानसीने घासुन घासुन धार लावत बसायचे.जेवण झाल्यानंतर सर्वजण गावातील दुसऱ्याच्या शिवारात झाडे पाडण्याचे व लाकडे फोडण्याची अंगावर घेतलेली कामे करण्यासाठी बाहेर निघुन जायचे.आम्ही आईसोबत नारगवंडीत जोंधळा भांगलना साठी निघण्याच्या तयारीला लागा यचो.कष्ट हेच तिच्या जीवनाचे व जगण्याचे तंत्र बनले होते.सतत व दररोज सकाळी पोटात दुखत असल्यामुळे माझ्या कडुन रानात जाण्यापूर्वी तेलाने पोट चोळुन घ्यायची.तिचे पोटात खळ खळ असा आवाज यायचा. पण तसे का होते याचा विचार करणारे वय व योग्यवेळी उपचार करण्यासाठी दादांच्या जवळ खरोखर पुरेसे पैसे नसायचे.काळाच्या ओघात यथावकाश माझ्या आई वडिलांनी अनुक्रमे दोन वर्षांच्या अंतराने यमुनाचे नंतरभाऊंचे,नंतर प्रभाचे, नंतर मंगलचे व शेवट माझे लग्न उरकून कर्तव्यता निभावली.हा मोठा खर्च दादांनी कसा निभा वला याचा मी साक्षीदार होतो.आम्ही सर्व भावंडांनी वरच्या रानमाळावरील गाईगुरांचे शेण वर्षभर गोळा करुन उकिरडा भरुन काढायचो.ते शेणखताचे विकल्या नंतर पैसे मिळायचे.आई सोडून सर्वजण रामाच्या डोंगराव रून डोक्यावर आणलेल्या जळ णाच्या मोळ्या गावात विकायचो.शेतातील बाटुकाची ओझी पुसेगा वच्या यात्रे दरम्यान शेतकऱ्यांना विकुन पैसे जमवायचे.कुणाच्याही बागाईतात भांगलन करण्यासाठी रोजंदारीने जायचो आंब्याच्या सिझनमध्ये दुसऱ्यांचे आंबे उतरायला मी दादांसोबत जायचो. आम्ही खटाव व पुसेगावच्या एस टी स्टॅण्डवर पिकलेल्या आंब्याच्या पिवळ्या धमक पाट्या घेऊन विकायला बसायचो.रामु नेरकर, बापु माळी,यांच्या विहिरीचे काम दादांनी स्वतःअंगावर घेतले होते. विहिरीतील खडकांना लोखंडी पहारेने सुरुंग पाडताना दादांच्या हाताला फोड येऊन फुटायचे व हाती धरलेली पहार रक्ताने भराय ची.तरीही दादा शांत पणे बसत नव्हते. दुसऱ्या बाजुला नोकरी निमित्त आम्हा उभयतांना बाहेर पडावे लागले.आता घरी वहिनी आई वडीलच उरले.ज्या घरात आमचे बालपण संपले.त्याच घरात आई आता अखेरचे दिवस मोजत होती. काळ पुढे सरकत होतो.तो पर्यंत आईचे वय परि पक्व वृद्धाव स्थेत येऊन ठेपले. आणि पोट दुखीचा आजार हात धुवून पाठीशी लागला.त्या काला वधीत बॅंकेच्या कर्जावर वाई येथील घर बांधणीचे काम पूर्ण होत आले होते.आई आजारी आहे तिला औषध उपचार व दवापाणी यांची गरज आहे.असे बहिणींचे सतत फोन यायचे. तरीही गावी जाऊन आईला वाईत आणले.डाॅ पतंगे यांचे दवाखान्यात अडमिट करुन उपचार सुरु ठेवले.दहा ते पंधरा दिवसांनी मला ती सारखी म्हणा यची की,मला खातगुणला घालव मला येथे करमत नाही. आईला खातगुणला पोच केली. तेव्हा चालणे उठणे,बसणे व्यवस्थित होत होते.नोकरीच्या निमित्ताने मला महाबळेश्वर परिसरातील कांदाटी खोऱ्यात शिक्षक म्हणून बदली स्वरुपात जाण्याचे अचा नक पत्र वाचताच आईच्या वियोगाचे दु:ख सतावु लागले. फोन वरून बहिणींना सांगायचो की,मी घर खर्चात अडकलोय‌ आपण आईचा सोन्याचा अलंकार मोडुन आपण उपचार करावेत.सौ. सौ.सुवर्णा चि.श्रीकांत व विक्रांत यांना शिक्षणासाठी वाईतील नवीन घरात ठेवण्याचा निर्णय घेतला. आपल्याला वैयक्तिक वाट्याला आलेला विजन वास आपण एक ट्याने सहन करायचा.असे मनात ठरवुन टाकले.व कांदाटी खोऱ्यात जाण्यासाठी तयार झालो.आता आईला पाहून यावे असे आतुन वाटत रहायचे.यासाठी संस्था चालकांची भेट घेऊन दोन दिव सांची मुदत मागितली.आम्ही उभयता गावी पहावयास गेलो तेव्हा ती अंथरुणा वरच होती. मला पाहुन तिला काय वाटले असेल देव जाणे.आईला पाहुन वाईला आलो आणि आईची प्राणज्योत मालवली.आई वडील स्वर्गवासी झाले या घटनेला बावीस वर्षे झाली तरीही मला त्यांचे स्मरण होतं आहे.आता पितरांचा पंधरवडा सुरु आहे. सौ.सुवर्णाने सकाळी सहा ते दहाच्या दरम्यान स्वयंपाकाची सिध्दता केली.नैवैद्याचे सर्व पदार्थ केळीच्या पानावर भरले.आम्ही उभयतांनी स्लॅबवर जाऊन नैवैद्य दाखविला व आई दादांना विनंती केली.आपले अस्तित्व दाखवा. तुमच्या सुनेने केलेल्या स्वयंपा काचा आदर राखा.असे म्हणताना मला रडे अनावर झाले. तोच दोन कावळे समोरच्या आंब्यावर येऊन मोठ्याने ओरडु लागले.आणि हळूहळू नैवैद्यावर तुटुन पडले. पिंडाला कावळा शिवल्याने आण खीनच मला बरे वाटले.आणिआम्ही उभयतांनी वाकुन नमस्कार केला.
मा.प्रा संभाजी लावंड वाई

error: Content is protected !!