घाटमाथ्यावर असंघटित बांधकाम कामगारांच्या घरकुल योजनेचा सर्वे करण्यास प्रारंभ
नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- असंघटित बांधकाम कामगारांसाठीच्या घरकुल योजनेचा सर्वे बहुजन असंघटित बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर(दादा)माने यांच्या मार्गदर्शना खाली घाटमाथ्यावरील घाटनांद्रे,तिसंगी परीसरात स़रू करण्यात आला आहे.यावेळी बहुसंख्येने असंघटित बांधकाम कामगार उपस्थित होते.
यावेळी शासनाच्या वतीने सुकुमार कोळी व अमित पाटील यांनी ही प्रक्रिया पार पडली.यावेळी बहुजन समाज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गौतम कांबळे,अमोल कांबळे,प्रशांत रास्ते,नितीन मदने,प्रविण मदने,सौ बायडा रास्तेसह असंघटित बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना गौतम(भाऊ)कांबळे म्हणाले की सध्या सुरू करण्यात आलेल्या बांधकाम कामगार घरकुल योजनेच्या अगदी पात्र व गरजू लोकांसाठीचाच आवाहल शासनाला सादर करण्यात येणार आहे.तेव्हा या सर्वेसाठी बाधकाम कामगारांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.तर अगदी पारदर्शकपणेच सर्वे आवाहल आम्ही शासनाला सादर करणार असल्याचे सुकुमार कोळी यांनी यावेळी सांगितले.स्वागत अमोल कांबळे यांनी तर आभार प्रशांत रास्ते यांनी मानले.