आटपाडी तालुक्यात सर्व शासकीय कार्यालयामध्ये २८सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिन साजरा करा- मा.शाहीन शेख/ राजु शेख

नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख)-आटपाडी तालुक्यांमध्ये सर्व शासकीय कार्यालयांमध्ये 28 सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करणेबाबत आटपाडी पोलीस स्टेशन तहसील कार्यालय गट विकास अधिकारी पंचायत समिती सहाय्यक निबंधक भूमी अभिलेख अशा सर्व कार्यालयांमध्ये जनजागृती अभियान राबवण्याबाबत निवेदन देण्यात आले माननीय शाहिन शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली राजू शेख माहिती अधिकार आटपाडी तालुका अध्यक्ष यांनी सर्व कार्यालयांमध्ये निवेदन दिले माहिती अधिकार अधिनियम 2005 हा कायदा देशभरात दिनांक 12 10 2005 पासून लागू करण्यात आला आहे शासनाने वेळोवेळी जाणीवपूर्वक उचललेल्या पावलांमुळे अल्पावधीतच राज्यात हा कायदा लक्षणीय स्वरूपात लोकाभिमुख झाला आहे प्रसिद्ध करिता व प्रभावी अंमलबजावणी करिता शासन स्तरावर सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत दिनांक 28 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिवशी माहिती अधिकार अधिनियम या कायद्याखालील तरतुदी आणि कार्यपद्धती विविध माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देऊन व विविध उपक्रम राबवून त्या जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा शासनाचा मानस आहे असे जनहितार्थ शासन निर्णयात नमूद आहे या प्रतिवर्षी 28 सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात यावा असे निर्णय जनहितार्थ शासनाने घेतलेला आहे त्या अनुषंगाने आपले विभागात माहिती अधिकार या विषयावर प्रश्न मंजुषा चित्रकला निबंध वकृत्व स्पर्धा इतर सारख्या स्पर्धा तसेच चर्चासत्र व्याख्यानमाला आयोजित कराव्यात माहिती अधिकार कायदा हा भ्रष्ट प्रवृत्ती विरुद्ध आहे शासन स्तरावर या कायद्याची अंमलबजावणी झाल्यास जनतेमधील असंतोष कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे असे आमचे मत आहे तसेच माहिती अधिकार कायदा हा जनहितार्थ उपयोग केला पाहिजे कायद्याचा गैरवापर करणाऱ्या वाईट प्रवृत्तीला ठेचून काढण्यासाठी प्रामाणिक सज्जन शक्तीहीन कायद्याचा संघटित रित्या वापर केला पाहिजे संविधानातील तरतुदीनुसार आपण माहिती अधिकार दिन साजरा करावा असे आवाहन माहिती अधिकार महासंघाचे तालुका अध्यक्ष राजु शेख यांनी केले आहे.

error: Content is protected !!