कवठेमहांकाळ येथील महांकालीदेवी नवरात्र उत्सव नियोजनाची बैठक संपन्न
नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे) :- कवठेमहांकाळ येथील महांकालीदेवीच्या नवरात्र उत्सव साजरा करण्याबाबतची नियोजना संदर्भाची बैठक मंदिरामध्ये संपन्न होऊन नियोजना बाबतच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली.यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
मंदिरा मध्येच झालेल्या या बैठकीमध्ये नऊ दिवस चालणार्या देवीच्या विविधरुपातील पुजा,भजन,किर्तन,काकडासहच नियोजन,पार्किंग व्यवस्था,गर्दी नियोजन यासंदर्भातही चर्चा करण्यात आली.सध्या मंदिरची रंगरंगोटी,सुशोभीकरण व विद्युत रोषणाईचे काम अंतिम टप्प्यात असून परिसरात करण्यात आलेल्या स्वच्छते बाबतही या बैठकीत समाधान व्यक्त करण्यात आले.
यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ विजय कोरे,विश्वस्त बाळासाहेब गुरव,पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे,नगरपंचायत मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष मोरे,माजी जिप सभापती गजानन कोठावळे,राष्ट्रवादीचे महेश पाटील,भाजपचे दिलीप पाटील,काँग्रेसचे वैभव गुरव,जेष्ठ नेते अशोक जाधव,नगरसेवक विश्वनाथ पाटील व रणजित घाडगे,जगन्नाथ शिंदे,निशिकांत गुरव,विक्रांत पाटीलसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.