कवठेमंहाकाळ येथील राष्ट्रवादीचे धनाजीराव जाधव यांचे भाजपमध्ये जाहीर प्रवेश खासदारांचे धक्कातंत्र सुरूच

नवचैतन्य टाईम्स घाटनाद्रे /वार्ताहर(जालिंदर शिंदे):-रांजणी-लोणारवाडी येतील विविध पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशानंतर आता कवठे मंहाकाळ शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्हीजेएनटी सेलचे जिल्हाध्यक्ष धनाजीराव जाधव यांना आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये घेऊन खासदार संजय (काका) पाटील यांनी आपले धक्कातंत्र सुरू ठेवले आहे या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादीला एक मोठा धक्का समजला जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शुक्रवारी दिनांक २३ रोजी सांगली येथे जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय (काका) पाटील यांच्या नेतृत्वाखाली कवठेमंहाकाळ शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे व्हीजेएनटी सेलचे जिल्हाध्यक्ष धनाजीराव जाधव,दादासाहेब पाटील, चंद्रकांत चव्हाण,राजाराम चव्हाण,दीपक स्वामी,तानाजी जाधव,संभाजी संनदी,शिवाजी पाटील,रामचंद्र स्वामी,यांच्यासह त्यांच्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत खासदार संजय काका पाटील यांचे गतीशील नेतृत्व मान्य केले.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर खासदार संजय काका पाटील यांनी आपले धक्कातंत्र चालूच ठेवले आहे.त्यातच कवठेमंहाकाळ शहरातील हा मोठा धक्का मानला जात आहे.व्हिजेएनटी सेलच्या जिल्हाध्यक्षांनीच भाजपमध्ये प्रवेश केल्याने शहरातील आणखी काही मोठे कार्यकर्ते काकांच्या गळाला लागणार का? अशी चर्चा लोकांतून सुरू आहे. या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणण्यासाठी युवा नेते राहुल (भैया) गावडे,मोहनदादा कोठावळे,दयानंद सगरे,काकांचे स्वीय सहायक खंडोजी होवाळ यांनी शर्तीचे प्रयत्न केले.या प्रवेशामुळे कवठेमंहाकाळ शहरात खासदार पाटील यांचा राजकीय गट बळकट होत आहे.या प्रवेशानंतर बोलताना धनाजीराव जाधव म्हणाले की खासदार संजय (काका) पाटील यांच्या गतीमान नेतृत्वाखाली आपण भाजप बळकट करण्यासाठी काम करू व यासंदर्भात एक व्यापक आसा मेळावाही घेऊ असे सांगितले.

error: Content is protected !!