जि.प.शाळा पाचेगाव येथील शिक्षिका सौ मंगल घोडके आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)-जिल्हा परिषद शाळा पाचेगाव-बु (ता सांगोला) येथील अगदी उपक्रमशील शिक्षका सौ मंगल दिनकर घोडके यांनी आजवर शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या आदर्शवत कामाची दखल घेऊन त्यांना दिपकआबा साळुंखे-पाटील प्राथमिक सहकारी पतसंस्था व सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आदर्श शिक्षिका ‘पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यांच्या या यशाचे परिसरातून मोठे कौतुक केले जात आहे.
सांगोला येथील शिवशक्ती मल्टीपर्पज हाॅलमध्ये झालेल्या एका भरगच्च कार्यक्रमात प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या हस्ते व जेष्ठ शिक्षक नेते संभाजीराव थोरात व मच्छिंद्रनाथ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सौ मंगल घोडके यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी विविध मान्यवरांसह,शिक्षक,शिक्षकोतर कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना दिपकआबा साळुंखे-पाटील म्हणाले की पुरस्काराने आजवर केलेल्या कामाचा गौरव तर भावी जीवनासाठी मोठी प्रेरणा मिळत आसल्याचे सांगितले तर पुरस्कार निवडकर्त्यानी अगदी योग्य माणसाची निवड केल्याने या पुरस्काराची अगदी उंची वाढली आसल्याचे उदगार जेष्ठ शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांनी यावेळी बोलताना सांगितले.यावेळी गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे,शिक्षक नेते मच्छिंद्रनाथ मोरे,कार्याध्यक्ष पोपटराव सुर्यवंशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
स्वागत प्रास्ताविक मोहन आवताडे यांनी तर आभार सुहास कुलकर्णी यांनी मानले.सुत्रसंचालन डॉ राजेश्वरी कोरे यांनी केले.यावेळी आप्पासाहेब देशमुख,सांगली शिक्षक बॅंकेच चेअरमन विनायक शिंदे,संजय चेळेकर,लक्ष्मीकांत कुमठेकर,बब्रुवाहन काशिद,दिलीप ताटेसह शिक्षक,शिक्षकोतर कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.