तुळजाई हॉटेल खंडाळा येथे शारदीय नवरात्र महोत्सवा निमीत्य प्रतिवर्षाप्रमाणे मनसेतर्फे भाविकांना महाप्रसादाचे वाटप
नवचैतन्य टाईम्स उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी(आशा वाघ)तुळजापूर :- प्रतिवर्षाप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना धाराशिव जिल्ह्याच्यावतीने श्री तुळजा भवानी मातेच्या नवरात्र महोत्सवात पायी चालत येणाऱ्या देविभक्तांना तुळजापूर तालुक्यातील हाॅटेल तुळजाई धाबा मौजे खंडाळा येथे दि.२९ व ३० सप्तेंबर २०२२ रोजी मनसेचे धाराशिव जिल्हा संघटक अमरराजे कदम यांच्या हस्ते अन्नदान महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
प्रतिवर्षाप्रमाणे मनसेकडून अन्नदानाचा कार्यक्रम होत असल्याने भाविक भक्तांकडून मनसेच्या या कार्याबद्दल कौतुक केल जात आहे.यावेळी माजी तालुकाध्यक्ष राजाभाऊ कोरेकर,शहराध्यक्ष प्रमोद कदम,तालुकासंघटक उमेश कांबळे,तालुका उपाध्यक्ष अक्षय साळवे,खंडू कुंभार,झुंबर काळदाते ,सुरज कोठावळे,वेदकुमार पेंदे,विशाल माने,शरद चौरे,नागेश धुमाळ, संकेत कांबळे,प्रकाश जाधव,हणमंत जाधव सह अनेक मनसे कार्यकर्ते हजर होते.