खरसुंडी येथे मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीनपटाच्या चित्रप्रदर्शनास मा.कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश (भाऊ) खाडे यांची भेट

नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख)दिनांक १/१०/२०२२रोजी खरसुंडी येथे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून महात्मा गांधीजींच्या जयंती पर्यंत सुरू असलेल्या सेवा पंधरवड्यानिमीत्त भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी आघाडी मार्फत आयोजित करण्यात आलेल्या पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या जीवनातील काही महत्त्वाचे प्रसंग त्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची माहितीचे चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार सुरेशभाऊ खाडे यांनी आज चित्रप्रदर्शनास भेट दिली त्याप्रसंगी सांगली जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष मा.पृथ्वीराज देशमुख,संघटन सरचिटणीस मा.मिलींद कोरे,केंद्र सरकारच्या के आय ओ सी एलचे अध्यक्ष मा.प्रा.चांगदेव कांबळे,माजी जिल्हाध्यक्ष मा.बंडोपंत देशमुख ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मा.विलासराव काळेबाग,ओबीसी आघाडीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा.धोंडीराम इंगवले,किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मा.परशुराम नागरगोजे,भाजपचे जिल्हा चिटणीस मा.प्रमोद धायगुडे, आटपाडी मार्केट कमिटचे चेअरमन मा.भाऊसाहेब गायकवाड, देवस्थानचे चेअरमन मा भाऊसाहेब गायकवाड सांगली महानगरपालिकेच्या नगरसेविका सौ.सविता मदने,विलासनाना शिंदे,दिलीप सवने दीपक जाधव विलास जानकर संजय कोळेकर एकनाथ भोसले शंकर भिसे रवींद्र पुजारी आदी उपस्थित होते.
सदर प्रसंगी प्रास्ताविक मा.विलासराव काळेबाग यांनी केले यावेळी पालकमंत्री मा.ना.सुरेशभाऊ खाडे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व खरसुंडी व परिसराच्या विकासासाठी मी कटीबद्ध आहे असे सांगितले

error: Content is protected !!