धावडवाडी गावातील विविध विकासकामासाठी मा.नामदार सुरेश(भाऊ)खाडे कामगार मंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री यांना निवेदन सादर

नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख)-मौजे धावडवाडी ता.आटपाडी येथील गावांमधील विकास कामाचे निवेदन माननीय नामदार सुरेश भाऊ खाडे बांधकाम मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांना विविध विकास कामे पुर्ण करण्यासाठी पालकमंत्र्याकडे मागणी करण्यात आली असुन सदरचे निवेदन ग्रामपंचायत सदस्य इनुस शेख व राजू शेख यांनी दिले धावडवाडी गावामध्ये जाणारा रस्ता अतिशय खराब असल्याने नागरिकांना व शाळकरी मुलांना या रस्त्यावरून चालताना काट्यावरची कसरत करावी लागत आहे.तरी पालकमंत्री यांनी सदरच्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच मोडेवाडा वस्ती येथे आपल्या स्वीय निधीतुन सभामंडप देण्यात यावी असे ग्रा.प सदस्य व ग्रामस्थाच्या वतीने मागणी केली असुन माननीय विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रयत्नातून धावडवाडी गावामधील रस्त्याचे काम निम्मे पुर्ण करण्यात आली असुन उर्वरीत कामाचा निधी त्वरीत उपलब्ध करुन देण्यात यावी अशी मागणी निवेदनाध्दारे केली असुन सदर निधी उपलब्ध करुन देण्याची मा.नामदार सुरेश(भाऊ)खाडे यांनी ग्वाही दिली असल्याची माहिती ग्रा.प.सदस्य इनुस शेख व राजु शेख यांनी दिली.

error: Content is protected !!