डोंबिवली पुर्व मानपाडा येथील माऊली आरंभ सोसायटीचा एक पेन,एक वही उपक्रम संपन्न

नवचैतन्य टाईम्स डोंबिवली प्रतिनिधी(देविदास कोचळे)दि :2/10/2022
डोंबिवली पूर्व मानपाडा येथील माऊली आरंभ सोसायटीने गणपती उत्सवामध्ये एक पेन एक वही हा एक आगळावेगळा प्रकारचा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमामध्ये गणपती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी गणपती दर्शनाला येताना हार, फुले, मोदक हे साहित्य घेऊन येण्यापेक्षा सोबत येताना एक पेन आणि एक वही घेऊन यावी. आणि खरोखरच बघता बघता या *सोसायटीतील पदाधिकारी, सदस्य आणि गणपती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला.* सदर उपक्रमामध्ये जमा झालेल्या वह्या, पेन आणि इतर शालेपयोगी शैक्षणिक साहित्य हे कल्याण कोळशेवाडी येथील शिशुविहार प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयातील सर्व गरजू विद्यार्थ्यांना शाळेच्या वर्धापन दिन व महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने त्याचे वाटप करण्यात आले. सदर साहित्याचे वाटप करताना सोसायटीचे अध्यक्ष संजय अहिरे, सचिव रोशन जाधव, खजिनदार किरण पाटील तसेच प्रथमेश सनस, अक्षय मोरे रोहन महाडिक ,निलेश वजे आणि संजय डांगे उपस्थित होते.तसेच अशा प्रकारचे उपक्रम राबवावेत म्हणून मार्गदर्शन करणारे मा. दिलीप शेठ वजे ही या कार्यक्रमास उपस्थित होते.तसचे या उपक्रमाचे महत्व लक्षात घेऊन सोसायटी मधील सर्व सदस्यांनी ही खूप चांगल्या प्रकारे मदत केली
खरोखरच या मुलांना साहित्याचे वाटप करताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि साहित्य स्वीकारतानाचा उत्साह अवर्णीय असाच होता. सरते शेवटी शाळेचे मुख्याध्यापक आणि संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक यांनीही या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे खूप कौतुक केल
सर्व पदाधिकाऱ्यांचे,सदस्यांचे,महिला व बालवर्गांचे मनापासून धन्यवाद देवुन या कार्यक्रमात सहभागी होऊन मोलाची भूमिका बजावून मदत केल्याबद्दल सर्वाचे आभार मानले.

error: Content is protected !!