तिसंगी जिल्हा परिषद शाळेत स्कूल बॅगांचे वाटप
नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)-सध्या सुरू असलेल्या देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने तिसंगी ग्रामपंचायत सदस्य व तिसंगी सर्व सेवा सोसायटी सदस्यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना स्कूलबॅगांचे वाटप करण्यात आले.यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर मोठे हास्य उमटले.
यावेळी सरपंच रोहिणी सावळे,उपसरपंच शरद जाधव,सोसायटीचे चेअरमन प्रमोद कदम,माजी सरपंच वामन कदम,ग्रामसेवक चंद्रकांत कुंभार,रमेश पोळ,राहूल पोळ,बाळासाहेब कुंभार,प्रदिप पाटील,रघुनाथ कुलकर्णी,दिलीप कांबळे,अमोल पोळ,गौरीहार सावळे,अशोक जाधव, नंदकुमार पाटील,बबन जाधव,संभाजी पोळ,बाळू जाधव,ईश्वर कांबळे विठ्ठल पाटीलसह मुख्याध्यापिका सुवर्णा पारशेट्टी शिक्षक सर्वश्री झिना देसाई,गिरीधर सांवत,संतोष पाटील,पालक,विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत सुवर्णा पारशेट्टी यांनी केले तर आभार झिना देसाई यांनी मानले.