घाटनांद्रेच्या तलावात बुडून तानाजी वाघमारे या युवकाचा मृत्यू

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे /वार्ताहर(जालिंदर शिंदे)-घाटनांद्रे (ता.कवठेमहांकाळ) येथील तलावात पडून तानाजी सायबु वाघमारे (वय २५) रा पेहे ता पंढरपूर) या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची फिर्याद घाटनांद्रे चे पोलीस पाटील महादेव ऊर्फ एकनाथ विलास शिंदे यांनी कवठेमहांकाळ पोलिसात दिली आहे .
याबाबत पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी तानाजी सायबु वाघमारे (वय- २५ रा पेहे ता पंढरपूर जि सोलापूर) हा तरुण ५ ऑक्टोंबर रोजी घाटनांद्रे (ता.कवठेमहांकाळ जि सांगली) येथील स्मशानभूमी लगत असलेल्या यल्लंमा मंदिराजवळील तलावामध्ये पाण्यात बुडून मयत झाल्याचे आढळून आले आहे.या बाबतची फिर्याद दाखल झाली असून,या घटनेची कवठेमहांकाळ पोलिसात नोंद झाली आहे.अधिक तपास पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बेंबडे अधिक तपास करीत आहेत.

error: Content is protected !!