मुख्यमंत्र्यांच्या ईमेलने आरेवाडीच्या रुग्णास जीवदान शिवसेनेच्या अमोल जाधवांच्या प्रयत्नांना यश
नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/(जालिंदर शिंदे)-आरेवाडी (ता कवठेमहांकाळ) येथील रूग्ण बिरु आण्णाप्पा कोळेकर (वय-४०) हे काविळीसह रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण अगदीच कमी झाल्याने मोठे त्रस्त झाले होते.त्यामुळे त्यांना नातेवाईकांनी सांगली येथील मगदूम मल्टीसपेशालीस्ट हाॅस्पीटल मध्ये दाखल केले.तेथे त्यांना उपचारा दरम्याने मोठा खर्चही सांगण्यात आला.परंतु त्या खर्चाच्या आड त्यांची गरीबी येत होती.तो कसा करायचा या विवंचनेत सदर कुटुंबीय होते.त्यामुळे त्यांच्या घरचे चांगलेच हातबल झाले होते.
यादरम्यानेच त्यांनी ही गोष्ट गावातीलच धनंजय कोळेकर यांच्या निदर्शनास आणून दिली. तेव्हा धनंजय कोळेकर यांनीही ही गोष्ट कवठेमहांकाळ येथील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी असणारे अमोल जाधव यांच्याशी संपर्क करून सांगितली.तेव्हा अमोल जाधव यांनी याबाबत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोनवर संपर्क करुन सदरची माहिती दिली.
तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ त्या संबंधित मगदूम मल्टीसपेशालीस्ट हाॅस्पीटला मेल व्दारे संपर्क केला. त्यामुळे बीलामध्ये सदर रुग्णास मोठी सवलत मिळाली व बिरु कोळेकर यांच्यावर उपचार करणे सोयीस्कर झाले.यावेळी बिरु कोळेकर व त्यांच्या कुटुंबीयांनी शिवसेनेचे पदाधिकारी असणारे अमोल जाधव यांना खूप धन्यवाद दिले.