श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखा उमराणी यांच्या वतीने दुर्गा माता दौंड कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न
नवचैतन्य टाईम्स जत प्रतिनिधी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान शाखा उमराणी यांच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वात दुर्गामाता दौड या हिंदू देवतांचे जाज्वल्य सत्य व त्यांच्यातील चमत्कारिक दैवत्वाचे दर्शन व स्मरण पुन्हा पुन्हा व्हावे म्हणून दुर्गामाता दौड चे आयोजन करण्यात येते .विजया दशमीच्या भल्या पहाटे पासूनच या सोहळ्याची लगबग सुरू झाली व मोठ्या उत्साहात दौड संपन्न झाली.
सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील महाशरणी श्री.दानम्मादेवीचे जन्म स्थान असलेला पुण्य भूमी उमराणी येथे दुर्गा दौडचे आयोजन करण्यात आले.उमराणी गावचे सरपंच विजय कुमार नामद व उपसरपंच संजय शिंदे यांच्या हस्ते विश्वगुरू महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची भक्ती भावाने पूजा करून भगवे ध्वज फडकावीत मोठ्या संख्येने जमलेल्या धारकरी व रण रागिणींनींच्या सहभागातून डोक्यावर केशरी फेटे, एक सारखे दिसणारे सम वस्त्रे परिधान केलेल्या धारकऱ्यासह दुर्गामाता दौडला सुरुवात करण्यात आली.
गावातील सर्वच रस्त्यांवरून ग्रामदेवतांचे आशीर्वाद घेत असताना गावातील माता-भगिनी यांनी पुष्पवृष्टी व आरती करून दुर्गामाता दौड चे स्वागत केले.दुर्गामाता दौडची सांगता सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारक मध्ये शस्त्रास्त्रे व ध्वज पूजन करून केली गेली या वेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाहक डॉक्टर श्रीवर्धन शिंदे व शाहूराजे डफळे,सरपंच विजयकुमार नामद,हणमंत सिंदुर सर यांनी दुर्गामाता दौडी संदर्भात मार्गदर्शन केले.याप्रसंगी उपसरपंच संजय शिंदे,दिग्विजय डफळे,मा. अमरसिंह इंगोले चेअरमन जय हनुमान सोसायटी,आप्पासाहेब बिरादार ग्रा.प सदस्य ,डाॅक्टर विनायक शिंदे मा.ग्रा.प.सदस्य,संगमेश नंदीकोल,पाडुरंग घारगे,श्रीशैल परीट सो.सा.संचालक,संजय पवार,रमेश देशमुख,यांच्या सह मोठ्या संख्येने धारकरी दौडीत सहभागी झाले होते.यावेळी डॉक्टर श्रीवर्धन शिंदे म्हणाले की दुर्गामाता दौड म्हणजे देशाचा,संस्कृतीचा व हिंदू धर्माचा स्वाभिमान जनतेमध्ये निर्माण करणे हा आहे.