घाटनांद्रेत लांडग्यांच्या हल्यात नऊ मेंढ्या फस्त मेंढपाळाचे सुमारे पंच्याहत्तर हजाराचे नुकसान भरपाईची मागणी

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे /वार्ताहर(जालिंदर शिंदे)घाटनांद्रे (ता.कवठे महांकाळ) येथे झालेल्या लांडग्याच्या हल्ल्यात ९ मेंढ्या मृत्युमुखी पडल्या असुन,त्यामुळे मेंढपाळाचे सुमारे ७५ हजारांचे आर्थिक नुकसान झाले आहे.ही घटना गुरुवारी रात्री घडली.याबाबत अधिक माहिती अशी की जनवाड (ता.चिकोडी जि बेळगाव) येथील मेंढपाळ लक्ष्मण मुत्ताप्पा कोरे सद्या रा घाटनांद्रे ता कवठेमहांकाळ येथे मेंढरे चारण्यासाठी घेऊन आले आहेत.
दरम्यान घाटनांद्रे हद्दीमध्ये विजापुर- गुहागर या राष्ट्रीय महामार्ग लगत असणाऱ्या शेतात रात्री सुमारे एक ते दोन वाजण्याचे सुमारास पाऊस पडत असताना रस्त्यावरील शेतात लांडग्यांनी मेंढ्याच्या कळपावर हल्ला चढवला.पाऊस मोठ्या प्रमाणात होता.लांडग्यांनी केलेल्या हल्ल्यात नऊ मेंढ्या मृत्युमुखी पडल्या.त्यामुळे गरीब असणाऱ्या मेंढपाळ लक्ष्मण कोरे याचे सुमारे पंच्याहत्तर रूपयाचे नुकसान झाले असुन यामुळे त्याचे कंबरडेच मोडले आहे.वनविभागाचे वनरक्षक डी एस बजबळकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सदर घटनेचा पंचनामा केला आहे.पशुविकास अधिकारी आदित्य बाबासो गुंजाटे यांनी विच्छेदन करून प्रथमदर्शनी हा हल्ला लांडग्याचा असल्याचे सांगितले.या परिसरात लांडग्यांचा मोठा वावर आहे.घटनेची माहिती मिळताच माजी सरपंच अमर शिंदे,पोलीस पाटील एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.सदर मेंढपाळ शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली आहे.

error: Content is protected !!