नाथपंथी डवरी समाजाच्या वतीने सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. सुरेश भाऊ खाडे यांना विविध मागण्यासाठी निवेदन सादर
नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख)-आज रोजी नाथपंथी डवरी समाजाच्या वतीने सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. सुरेश भाऊ खाडे यांना नाथपंथीय देवरी समाज व भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा सांगली च्या वतीने माननीय ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विलास काळेबाग व ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य माननीय धोंडीराम इंगवले यांनी निवेदन दिले नाथपंथी डवरी समाजावर भिक्षा मागून जगत असताना तो भिक्षा मागायला गेल्यानंतर त्यांना चोर दरोडेखोर दरोडेखोर समजून मारहाण केली जाते तरी त्यांना भिक्षा मागून हिंदू धर्माचा प्रसार करून धान्य दक्षिणा मागण्यासाठी शासनाकडून ओळखपत्र मिळणे गरजेचे आहे या संदर्भात माननीय पालकमंत्री महोदयांना नाथपंथी डवरी समाज व ओबीसी मोर्चा च्या वतीने निवेदन देण्यात आले त्यावेळी माननीय मंत्री महोदय यांनी नाथपंथी डवरी समाजावर अन्याय होणार नाही यासंदर्भात आश्वासन दिले व नाथपंथी डवरी समाजाचा प्रश्न शासन दरबारी मार्गी लावू असे आश्वासन पालमंत्र्यानी डवरी समाजाला दिले.