कुची येथील सुझुकी व दुचाकी अपघातात एक ठार तर एक जखमी

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे /वार्ताहर(जालिंदर शिंदे) रत्नागिरी- नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर कुची (ता.कवठेमहांकाळ) येथे मारुती सुझुकी कार व दुचाकीच्या झालेल्या अपघातात तातोबा तमन्ना सोंदकर (वय ६३ रा मालगाव ता.मिरज) हे जागीच ठार झाले तर त्यांचे बंधू पोपट तमन्ना सोंदकर (वय५५ रा मालगाव ता मिरज ) हे गंभीर जखमी झाले.ही दुर्घटना रविवारी दुपारी दोन वाजण्याचे सुमारास घडली.या घटनेची कवठेमंहाकाळ पोलिसात नोंद झाली असुन,कवठेमहांकाळ पोलिस अधिक तपास करत आहेत.
याबाबत पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की तातोबा तमन्ना सोंदकर व त्यांचे बंधू पोपट तमन्ना सोंदकर हे दोघे आपल्या दुचाकी (क्र एम एच १०/ बी एफ ६३१५) वरून देवदर्शनासाठी गेले होते.दरम्यान देवदर्शन करून परतताना ते कुची हद्दीत,कुची गावात पासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर शिवगंगा हॉटेल नजिक आले असता भरधाव वेगाने येणाऱ्या मारुती सुझुकी कार क्रमांक (के ए ६५/एम ०६१३) या गाडीने जोरदार धडक दिली.या धडकेत तातोबा तमन्ना सोंदकर यांच्या डोक्यास मोठ मार लागल्याने ते जागीच ठार झाले तर त्यांचे बंधू पोपट तमन्ना सोंदकर हे गंभीर जखमी झाले.जखमी पोपट सोंदकर यांना पुढील उपचारार्थ सांगली येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.या घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.अधिक तपास कवठेमहांकाळ पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!