कविराज अमोल मांढरे यांना बेस्ट राईटर हा साहित्य पुरस्काराने सन्मानित

नवचैतन्य टाईम्स वाई (प्रतिनिधी)प्रसिद्ध साहित्यिक व पत्रकार कविराज अमोल मांढरे.वाई.जिल्हा सातारा. यांना नुकताच त्यांच्या साहित्य क्षेत्रातील उत्तम योगदानामुळे औरंगाबाद येथील शब्दगंध समूह या संस्थेतर्फे नुकताच बेस्ट राईटर.हा मानाचा साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर साहित्यिक कविराज अमोल मांढरे. यांचे स्वलिखित वैचारिक मंथन. हे पुस्तक देखील मोठ्या भव्य समारंभात प्रकाशित झालेले आहे. श्री मांढरे हे बऱ्याच वर्षापासून साहित्य क्षेत्रात उत्स्फूर्तपणे कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील अनेक वर्तमानपत्र, साप्ताहिक व मासिके यांमधून त्यांनी विविध समाज प्रबोधन लेख प्रकाशित केलेले आहेत. त्यांच्या या उज्वल यशाबद्दल विविध साहित्यिक, मित्रपरिवार, शिक्षक व प्राध्यापक वर्ग आणि ज्येष्ठांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. अमोल मांढरे यांनी भविष्यातही आपले पाय जमिनीवरच ठेवून समाजातील साहित्य प्रेमी, थोरांचा आशीर्वाद व मित्र परिवाराच्या साह्याने भविष्यातही निपक्ष व निर्भीडपणे साहित्य क्षेत्रातून समाजप्रबोधनाचे कार्य चालूच ठेवणार असे मत व्यक्त केले आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या नवचैतन्य टाईम्स या वृत्तपत्राचे परिवारात सामील झाल्याचा त्यांना अभिमान आहे.त्यांचे अनेक विविध सामाजिक समस्या आणि प्रबोधन पर लेख आपल्या वृत्तपत्रात प्रकाशित झालेले आहेत.अमोल मांढरे हे सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वाई शहर शाखा.येथे कार्यरत आहेत. त्यांना आतापर्यंत अनेक साहित्य पुरस्कार प्राप्त झाले असून अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय काव्यसंग्रहात त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे. त्यांच्या मतानुसार त्यांचा साहित्य जीवनातील प्रवास हा अनेक संघर्षांनी भरलेला आहे.. तेव्हा आजच्या काळात विद्यार्थी वर्गाने लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे शिक्षण हे एक वाघिणीचे दूधच असते आणि त्याचे फळ भविष्यात त्यांना नक्कीच मिळेल. असे साहित्यिक अमोल मांढरे विद्यार्थ्यांना शुभ संदेश देतात. त्याचबरोबर युवक वर्गाने कुठल्याही क्षेत्रात कार्य करीत असताना कुणाचेही जास्त अनुकरण करता स्वतःच्या मेहनतीने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करावी. कारण तीच भविष्यात सदैव टिकून राहील. त्याचबरोबर युवक वर्गाने स्वहिता बरोबर समाज हिताचे आणि राष्ट्रहिताचे ही कार्य करावे असेही श्री कविराज अमोल मांढरे यांनी विचार मांडलेले आहेत. आणि समाजातील ज्येष्ठ व अनुभवी लोकांची खंबीरपणे साथ माझ्या पाठीशी भविष्यातही सदैव राहावी. हीच सदिच्छा.
आपला कविराज अमोल मांढरे वाई जिल्हा सातारा.
Mobile no.7709246740.

error: Content is protected !!