कवठेमंहाकाळ तालुक्यात पाणीपुरवठा योजनेच्या पूर्ततेसाठी नेहमीच तत्पर-आमदार सुमनताई पाटील

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)-पाणी हे जीवनाचे मुलभूत अंग असुन पाणीपुरवठा योजनेच्या पूर्ततेसाठी आपण नेहमीच तत्पर आसल्याचे उदगार तासगांव- कवठेमहांकाळ मतदारसंघाच्या आमदार श्रीमती सुमनताई पाटील यांनी वाघोली (ता कवठेमहांकाळ) येथे काढले. त्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या भूमी पूजन निमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रमा प्रसंगी बोलत होत्या अध्यक्षस्थानी प्रदेश राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल (दादा) पाटील होते.
यावेळी बोलताना आमदार सुमनताई पाटील पुढे म्हणाल्या की या नळ पाणीपुरवठा योजने द्वारे वाघोली,गर्जेवाडी व कुंडलापुर या गावचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार असून या योजनेतून नळाद्वारे प्रती मानसी ५५ लिटर पाणी देण्याची आखणी करण्यात आली आहे.तर यावेळी विशाल (दादा) पाटील बोलताना म्हणाले की स्व आप्पासाहेब शिंदे यांनी हयातीत असताना या योजनेसाठी मोठे प्रयत्न केले होत.त्यांच्या पश्चात ही योजना पुर्ण होतीया हीच खर्या आर्थाने त्यांना श्रध्दांजलीच म्हणावी लागेल.त्यांचे स्व वसंतदादा पाटील घराण्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते.राहून राहून त्यांची उणीव भासत आसल्याचेही ते म्हणाले यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संजय (बापू) हजारे,वाघोलीचे माजी सरपंच रावसाहेब शिंदे,घाटनांद्रेचे अमर शिंदे,यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी आमदार श्रीमती सुमनताई पाटील यांच्या हस्ते व राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल (दादा) पाटील यांच्या उपस्थितीत या नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन करण्यात आले.यावेळी ताजुद्दीन तांबोळी,राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संजय (बापू) हजारे,वाघोलीचे सरपंच सुरेश गायकवाड,अंनिसचे प्रा दादासाहेब ढेरे,गर्जेवाडीचे माजी सरपंच प्रल्हाद (बापू) हाक्के,घाटनांद्रेचे माजी सरपंच अमर शिंदे ,कुंडलापुर सोसायटीचे अध्यक्ष दिपक चव्हाण,जाखापुरचे प्रभारी सरपंच संजय पाटील,काँग्रेसचे युवा नेते सुशांत शिंदे,तिसंगीचे माजी सरपंच वामनराव कदम, तानाजीराव कदम,तुकाराम शिंदे,अमित शिंदे,दिनकर शिंदे, अभियंता अक्षय पाटील,ठेकेदार अशोक जाधवसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वागत प्रास्ताविक रावसाहेब शिंदे यांनी तर आभार अमित शिंदे यांनी मानले.सुत्रसंचालन सुशांत शिंदे यांनी केले.

error: Content is protected !!