खातगुण गावचे उपसरपंचपदी शिवाजी लावंड यांची बिनविरोध निवड

नवचैतन्य टाईम्स वाई प्रातिनिधी(संभाजी लावंड)-खातगुण ता.खटाव जि.सातारा येथील हे गाव राम रहिम संघटना ही राष्ट्रवादी पक्षाचे समर्थन कर णारी असुन,अलिकडे समाज व राजकारणात गावचे नागरिक विकासासाठी एकत्र झटताना दिसत आहेत.आता ही एक नविन क्रांतीची लाट आहे.ही एक नवीन पिढी असुन श्री वसंत कृष्णा जाध व गुरुजींच्या मार्गदर्शना खाली चांगलीच फळी तयार होत आहे. गावच्या विकासासाठी श्री शिवाजी रामचंद्र लावंड.देशसेवा निवृत्त माजी सैनिक यांना ही संधी मिळालेली आहे.प्रसंन्न व तेजस्वी विचारांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड केल्यामुळे गावात आनंद भरुन वाहतो आहे.श्री शिवाजी लावंड यांनी देशसेवेत एकुण अठरा वर्षे देशाची जबरदस्त सेवा केली आहे.तरीपण गावच्या विकासाची शुध्द निर्मळ व पवित्र भावना हा त्यांचा मुळ स्वभाव आहे. गावा तील कोणाचे ही व कोणतेही काम असो त्यात त्यांची मदतीची भुमिका पार महत्वाची असते.श्रीराम देवस्थानचे कधीकाळी ते चेअरमन होते.धार्मिक व सामा जिक काम पुढे होऊन मोलाचा वाटा उचलतात.बरे मान सन्मान पुरस्कार या बाबी ते अंगाला लावून सुध्दा घेत नाहीत.गावातील ग्रामदैवत श्री भैरवनाथांच्या यात्रेचे ते जनक ठरतात.कधीकाळी बंद पडलेल्या यात्रेला त्यांनी जीवंत केले आहे.गावच्या विकास कामासाठी उपाय योजना लक्षात घेऊन विकासाचे पाऊले उचलण्याची देशभक्ती गावभक्ती त्यांचे रक्तात व विचारात आहे

error: Content is protected !!