प्लेग

नवचैतन्य टाईम्स वाई प्रतिनिधी(प्रा.संभाजी लावंड)-भारतात एकोणीसे सतरा सालात प्लेगाची साथ वणव्यासारखी वेगाने पसरत होती.अगोदर मुंबई,पुणे,सातारा,कोरेगाव,कऱ्हाड,सांगली,तसेच माण व खटाव या दुष्काळी तालुक्यात प्लेगाने लोकांना मरण यातना दिल्या. जांघेत किंवा काखेत आपोआप मांसल गाठ तयार व्हायची. अंगामध्ये सनकुन ताप भरायचा. व्यक्तीला मरण प्राप्त व्हायचे. मृत देहाचे कलेवर स्मशानात पोहचवुन माघारी येई पर्यंत दुसरी व्यक्ती मयत झालेली असायची. कृष्णा,कोयना,वेण्णा,वारणा व येरळा नदीच्या खोऱ्यात माणसांच्या चिता एक सारख्या रात्रं दिवस धगधगत होत्या.ग्रामीण भागातील नदी,नाले,ओढ्यांच्या काठावर खड्डे घेऊन प्रेते माती आड केली जात होती.शोक करायला कोणाला ही वेळ नव्हता.गावंच्या गावं ओस पडु लागली.गावं सोडुन माणसे आपापल्या शिवारात चालती झाली. एकमेकांच्या संपर्कात यायला माणुस माणसालाच घाबरु लागला.मरण कळा अंगावर सोसत विकलांग जीवन जगणारी माणसे, डोळ्या समोरच मेलेली मढी पाहुन घाबरुन जात होती.मृत्याच्या भितीने माणसे लेकरा बाळे,गाई, गुरे, ढोरे, शेरड, करडं,कोंबड्यांचे खुराडे,व पाळीव प्राणी सोबत घेऊन पांडा मेजरच्या देशपांडीत,बंडू चव्हाणांच्या माळावर,संभा बामणाच्या बामणकीत,निव मामाच्या आटाळकीत,दादा पाटलांच्या बेंदत,परबु बेलदारा च्या बेलदारकीत,निजाम भाईंच्या मुलानकीत पांडु दिनकरच्या मौटीत,रामाकुसाच्या नारगवंडीत कोंडीबा सावकाराच्या म्हारकीत, विनायक अण्णांच्या खग्यात, रामु नेरकराच्या शेरीत,बाळकु भक्तांच्या रानात,गोरख हरीच्या बर्डात,शिवा वाटाऱ्याच्या मळवीत,मच्चु नानाच्या पांताळात,महादु डॉक्टरच्या गव्हळीत,सोपान काकांच्या पाच बिग्यात,नारायण सातारकरांच्या पळशीत,पकु न्हाव्याच्या गडचावरात व उत्तम दादांच्या रेवनसितात आपापल्या शेतामध्ये कुडाची खोपटी करुन लोक राहु लागले. त्यातील काही लोक श्री रामेश्वराच्या पायथ्याशी असणाऱ्या महादेव तळ्याकडे सरकली.व तो मानवी समुह तेथेच राहु लागला.निसर्गा पुढे कोणाचेही चालत नव्हते. तापसरी दिवसेन दिवस वाढतच होती.तोच लोक मान्य टिळक प्लेगाच्या साथीने मृत्यू पावल्याची बातमी खेड्या पाड्यात जाऊन धडकली.आणि सारा देश दु:खात बुडाला. याच काळात खटाव तालुक्यातील येरळा नदीच्या खोऱ्यात पुसेगावी शिव शंकराचे एक जुने प्राचीन शिवालय दाट झाडीमध्ये आपले अस्तित्व हरवुन बसले होते.या निर्जन ठिकाणी श्री सेवागिरी महाराज शिव शंकराच्या अंतस्थ प्रेरणेने कराचीवरुन आपल्या भागातील लोकांच्या समवेत आले.ते खातगुण,नेर,विसापूर, कटगुण या परिसरात साक्षात्कारी ठिकाणाच्या शोधात फिरत होते. शेवटी महाराज पुसेगावी नदी काठी शिवालयात निवास करुंन राहीले.योग साधनेचे तेज त्यांच्या मुख मंडलावर चमकत होते.उंची पुरी शरिर यष्टीमुळे ते सशक्त व सदा तारुण्यात असल्यासारखे दिसायचे.महाराज शुभ प्रभाती येरळा नदीवर स्नानासाठी डोहात उतरत तेव्हा पाण्यातील जलचर मासे सुध्दा त्यांच्या दर्शनाला डोहातुन वर आनंदाने उसळ्या मारत होते. बराच काळ एकांत वासात राहिल्यामुळे ते सिध्द हस्त योगी बनले.पुसेगावपंचक्रोशीतील श्रध्दा ठेवणारे सेवागिरींना
महात्मा मानणारे लोक पुर्व पुण्याईने नकळत त्यांच्या सह वासात खेचले गेले.महारांजानाही अशा भक्तांचा खुपचं लळा लागा यचा.अनेक भक्तांना त्यांच्या शिवाय करमत नव्हते.काही वेळा भक्तांना व त्यांना ही भेटीची तळमळ लागुन रहायाची. सेवा गिरीची वाणी अक्षय व शुभ वर्तमान बोलायची.दिलेला आशी र्वाद तो खराच ठरायचा. त्यामुळे ठराविक लोकांना बोध झाल्यामुळे ते त्यांचे नकळत भक्त बनले.पुसेगाव,मोळ, डिस्कळ, बुध, काटकर वाडी,कटगुण,खात गुण,विसापूर,वर्धनगड,नेर या गावची माणसे महाराजांच्या भोवताली बसुन अध्यात्माच्या चार गोष्टी ऐकायला येत होती.खास करुन खातगुण गावाहुन मुंजावर आळीतील काळ्या सावळ्या वर्णाचे व डोकीस पांढरा पटका गुंडाळणारे लिंबाजी अण्णा,श्री तुकाराम झांझुर्णे,पैरण व धोतर परिधान करणारे दर्ग्या शेजारील शंकर मास्तर एस टी कर्मचारी आनंदराव लावंड यांचे वडील धारदार नाकाचे व कपाळावर शिवगंध रेखाटणारे शंकर बापु,त्यांच्याच शेजारचे सावरकरासारखा डोळ्यांवर चष्मा असणारे निवृत्ती मामा,अवाढव्य शरिराचे बंडु नाना,आद्य किर्तनकार व पांडुरंगाचा साक्षात्कार लाभलेले ,नेहरु व धोतर परिधान करणारे श्री पांडुरंग आप्पा व त्यांचे सख्खे बंधु तुकाराम पहिलवान,निरक्षर असुन सुद्धा ग्रंथ वाचन करणारे रामा कुसा.व बाळु पाटलांचे वडील श्री रामभाऊ पाटील,विष्णु माने,व गणपत माने,हे सर्व सेवा गिरीचे परमभक्त होते.ही मंडळी राम ओढा ओलांडून शिंकदरभाईच्या गिरणी जवळुन काटकर वाडीच्या रस्त्याने न जाता न्हाव्याच्या डेरे दार आंब्या खालुन मधुनच वावरा तुन चालत पुसेगावच्या मंदिरात महाराजांच्या सहवासात दिवस दिवस घालवत.आता प्लेगाची साथ आल्यामुळे कोणी ही कोणा कडे जात येत व फिरकतही नव्हते. पण आता ते सर्वजण दुरा वले गेले होते.येरळा नदीच्या व श्रीराम ओढ्याच्या पवित्र संगमा वर खातगुण गाव निसर्गातील झाडी व झुडपांनी वेढलेले होते. बाळसे धरलेल्या लहानमुलाने मुक्त रांगावे तसा गाव शोभीवंत दिसायचा. धरणामुळे गाव शिवा रात जल टिपाडे प्रत्येक पाण वठ्यावर तहान भागवत होते.आकाशाचे निळे प्रतिबिंब पाण्यात निवांत खेळायचे.नेर तलावाच्या गोड्या पाण्यावर गावची समृध्दी नांदत होती. रामा मांडक्याने व अंता रामोशाने लावलेल्या कडब्यांच्या गंजी प्रत्येकाच्या परड्यात राखीव जागे वर उत्पन्न किती आहे हे सूचित करत होत्या.श्री राम ओढ्यातील घाणेरीच्या फुलांचे, निर्गुडीचे व लाल फुलांच्या कण्हेरीचे ताटवे वाऱ्यावर झुलायचे.करंजाची झाडे गावावर चवऱ्या ढाळायची.नदी काठावर लेंडी जांभळांच्या रांगा ऋतु नुसार फल प्रदान करत गारवा द्यायची.गावातील जुने प्राचीन वटवृक्ष व शिवारातील आंब्याची झाडे गावाचे गत वैभव आठवत बसल्या सारखे वाटायचे. गावची लोकसंख्या ही मुठभर असली तरी या गावातील ते खरे खुरे देव गणच होते.त्या काळी सहा ते सात वाडे अस्तित्वात होते. किशाभाऊ पाटलाचा वाडा, नवावाडा,जगु सातारकराचा वाडा भानु जाधवांच्या पुर्वजांचा भग्न वाडा, बाळकु भक्तांचा वाडा, मारती बुटकाचा वाडा, डपेदार आप्पांचा मधलावाडा, माने यांचा वाडा, संभा बामणाचा वाडा, सुताराचा वाडा,व न्हाव्याला वाडा.हे वाडे आपल्या गावचे वैभवाची साक्ष देत होते. खालच्या माळावर उगवणारा तेजस्वी सुर्य श्री राममंदिरांच्या कळसाला,पीर साहेब राजेवल्ली बागसवार यांचे शिखराला गोंजारत सोनेरी मुलामा देत दररोज गावात प्रवेश करायचा.तो गावातील प्रेमळ माणसांना मन लावून,व डोळ्यात पाणी आणुन शोधत फिरायचा. कारण गावात खाल्या मीठाला जागणारी माणसे होती.ते लोक दिसतील त्याला या जेवायला म्हणायचे. पुढची व्यक्ती घ्या देवाचे नाव अशी आदराने म्हणायची.तीच देव माणसे आज प्लेगाच्या भितीमुळे सर्वदूर गेली होती.त्यामुळे गावात मरुन पड लेली निर्जिव शांताता दिवसा ढवळ्या जीव खायला उठायची. त्यावेळी येरळा नदीचे खोरे माण साविना एकटे एकटे पडले होते. गणपत तुपे,दगडु आण्णां व परसु आण्णांच्या तात्कालिन सांगण्या वरुन तापसरीत चार पाच महिने माणसे बाहेरच राहीली होती. त्या काळात अनेक लहान मुला व मुलींचे जन्म झाले होते. जन्म तारखा लोक लिहुनही ठेवत नव्हते.एकोणीसशे एकवीस सालात बहुतांशी प्लेगाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटले गेले होते.लोक कुटुंब कबेला घेऊन घराच्या ओढीने गावात परतत होते.गावातील वाडे माणसांनी फुलत होते.श्री राम ओढ्याला
गुदगुल्या वाटत होत्या.तर येरळा माय अधिकच संथ गतीने धरणा वरुन लहान मुली सारखी बेफाम होऊन एकसारख्या उड्या हाणत होती.गावाचे आता गोकुळ बनले. शिवा कोळी,भानुकोळी,नामु कोळी, आणि आशोक कोळी यांच्या पाणी भरलेल्या कावडी रांजणात आवाज करीत कोसळत
होत्या.तर श्रीरंग व पीऱ्या न्हाव्ही यांच्या दारात केश कापण्यासाठी गावकरी येरझारा घालु लागले. आण्णा हाजारे यांच्या दुकानात घणाचे घाव घातलेले आवाज पीराच्या प्रवेश द्वारातील दुकानात उमटत होते.बादशहा पठाणांच्यात सायकल पंक्चर काढायला मुले गर्दी करत होते.गाव शिवारातील ज्वारी नुकतीच पोटऱ्यात आलेली होती शाळुंची गच्च भरलेली कणसे नुकतीच निसवायला सुरु वात झाली होती. आणि पाखरांचे थवे निळ्या आकाशातील शिवा रात उंच झेपावत होते.श्री पांडु पाटील व एम. टी.सरांचे वडील तुकाराम लावंड,व राघव तेली यांनी गावातील तालीम चालु ठेवली होती. रामा भजी,बाबु भिस्ते,निजाम भाई, माजी सरपंच राजाराम गुजर, किर्तनकार आप्पा यांचे भाऊ तुकाराम पहीलवान यांना सर्वजण तात्या म्हणायचे.यांनी अनेक गावचे फड गाजवले होते.अंगात पहिलवानकी भिनल्यामुळे त्यांची तब्बेत पाहुन समोरचा घाबरुन जायचा. तुका राम पहिलवानाने पंचक्रोशीत मोठा नावलौकिक मिळवला होता.पंचक्रोशीत ते नावाजलेले पहिले पहीलवान होते.अगोदरच शेतात धान्यलक्ष्मी प्रसंन्न होत होती.ज्वारीची कणसे दाण्यांनी भरगच्च भरत होती. आणि काही कोवळी कणसे हुरड्यात प्रवेश करीत होती.श्री सेवागिरी महारा जांना भेटण्यासासाठी मुंजावर आळीचे तुकाराम झांझुर्णे, शंकर मास्तर,शंकर बापु,लिंबाजी आण्णा,रामाकुसा,बाळु पाटलांचे वडील राम पाटील,विष्णू माने, गणपत तुपे यांनी मधल्या वाटेने पुसेगाव गाठले.शिवालयात महा राज निरव शांततेत ध्यानस्थ बस लेले होते. त्यांच्या आज्ञा चक्रावर भक्त लोक येत असल्याचे अंतर्ज्ञानाने समजले.तोच ही मंडळी शिवालयात पोहचली.मग भक्तांच्या डोळ्यातील प्रेमादर पाहुन महाराजांना राहवले नाही. भक्त पायावर लोटांगण घेऊ लागले. आणि महाराज त्यांना आशीर्वाद देतच राहिले.भावनेचा भर ओसरल्यावर महाराजांनी भगवत गीतेचे छोटेसे पुस्तक राम पाटलाला देऊ केले होते.ते पुस्तक आयुष्याच्या अंता पर्यंत त्याचे सोबत होते.सर्व भक्तांनी हुरडा खाण्यासाठी खातगुणला येण्याची हात जोडून विनंती केली. महाराजांनी तात्काळ येण्याचे कबुल केले.व लोक माघारी खात गुणला आले. दुसऱ्या दिवशी तुकाराम झांझुर्णे यांनी रानातुन महाराजांच्यासाठी चांगली टपोरी हुरड्यात असलेली कणसे आणुन ठेवली व अंगणामध्ये आगटी पेटवण्यासाठीची व्यवस्था केली. महाराजांना बसण्यासाठी डोळे मिचकावत बोलणाऱ्या व सर्वच केस पिकलेल्या चौकातील भाऊ गुजराकडुन दुकानातील कडक कात्याची लाकडी बाज विणुन तयार ठेवली होती, त्यावर स्वच्छ घोंगडे अंथरले होते.शंकर बापुंनी दिवस उगवायच्या आत बैलगाडी जुंपुन पुसेगावी आणली.बैल गाडीने महारांना काटकर वाडीतुन मधल्या वाटेने श्रीराम ओढ्यातुन गावातील पीराच्या मंदिरात आणले.त्यावेळी अफाट जन सागर सेवागिरींना पहाण्यासाठी व दर्शनासाठी लोटला चरणावर लोटला होता.महाराज ऐन तारुण्यात होते.अंगावर भगवी कफनी व कमरेला गुंडाळलेले लेहंग्यासारखे भगवे वस्त्र उंची पुऱ्या देहाला शोभुन दिसत होते. गौरवर्णामुळे ते भारदस्त दिसायचे.दाढी मिशा, डोईवरचा जठांचा संभार व्यक्तिमत्त्वात सात्विकता फुलवित होता.सरळ नासिका, तेजस्वी व करुणेनी ओथंबलेली नजर व तेजस्वी वाणी लोकांना आशीर्वाद द्यायची. अजानुबाहु असे त्यांचे हात होते. अंगणातच टाकलेल्या बाजेवरील घोंघड्यावर महाराज आसनस्थ झाले.तो पर्यंत शंकर मास्तरने आगटी पेटवली.भक्तांनी चारी ही बाजुंनी शेणकुटाच्या भल्या मोठ्या आगटीत ज्वारीची हिरवीगार कणसे खुपसली. सर्व होरपळलेली कणसे एकटा तुका राम पहिलवान तळ हातांनी मळुन गरम हुरडा फुंकुन मोठ्या परातीत साठवित होते. परात भरुन गरम हुरडा महाराजांनी स्वतः
लोकांना प्रसाद म्हणून वाटु लागले.तर लोकांच्या आग्रहास्तव महाराजांनी ही सर्वांचे बरोबर हुरडा मोठ्या आनंदाने खाल्ला. सेवागिरींचे मन तुकाराम पहिल वानाकडे आकर्षित झाले. याला कारण तुकारामाची देहबोली व निरागस भाव आणि भोळी भक्ती होय.ते त्यांच्या कुस्ती वर व हुरडा हातावर मळणाऱ्या पध्दतीवर प्रसंन्न झाले होते.पुन्हामहाराजांना बरोबर तीन वाजता शंकर बापुंनी बैलगाडीने पुसेगावी आणुन सोडले.दोन महिन्याने यथावकाश सुगीचे दिवस संपले होते.रानातील मळुन झालेली ज्वारी बैलगाडीने घरपोच होत होती.आणि गावात एक दुर्घटना घडली.तुकाराम पहिलवान एका एकी मयत झाले.ही बातमी
पंचक्रोशीत पसरली.आणि सारा गाव शोकसागरात बुडाला. पुसेगा वी सेवागिरी महाराजांना ही बातमी लोकां मार्फत समजली. आपल्या लाडक्या भक्ताचे अखेरचे दर्शन घेण्याची जबरदस्त इच्छा निर्माण झाली.इकडे खातगु णमध्ये शंकर बापुंनी बैलगाडीने पुसेगावला महाराजांना आणण्या साठी तयारी सुरु केली.महाराज बैलगाडीने चावडी जवळ उतरले. हजारो लोक त्यांना पहाताच ऊठुन उभे राहिले. तुकाराम पहिलवानाचे घरी कलेवर बाहेर ठेवले होते.महाराज चालत महा डीच्या घराबाहेर येऊन थांबले. प्रेता जवळची सर्व माणसे बाजुला सरकली.लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी मयत तुकाराम पहिलवाना ला आपल्या अंगच्या योग साम र्थ्याच्या बळावर जिवंत करण्याचे मनोमन ठरवले. ही बातमी वाऱ्या सारखी गावात पसरली.मेलेला माणुस जिवंत कसा होतो.हे पाहण्यासाठी माणसांची नुसती पांढर उठली होती. महाराज प्रेताजवळ जाऊन उभे राहिले. आणि उभ्या उभ्या अंत र्मुख होऊन ध्यानमग्न झाले. त्याच्या दोन्ही हातावर थंडगार चैतंन्य लहरी जमा होऊ लागल्या. महाराज तेज पुंज दिसु लागले. अंतस्थ कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यामुळे सेवागिरीं च्या उजव्या हातात पांढरेशुभ्र चैंत न्याचे ओघ वाहु लागले.तुकाराम पहिलवानाचे मस्तकावर उजवा हात ठेवून चैतंन्य संक्रमित करु लागले. चैतंन्याचा ओघ प्रचंड प्रचंड वेगाने संक्रमित होताच पहिलवान जिवंत होऊन ऊठुन बसले.खातगुण गावातील लोकांनी हात वर करुन महाराजांचा जयजयकार केला.ही घटना एकोणीसशे तेवीस साला तील आहे. त्यामुळे ही बातमी तालुका जिल्ह्या बाहेर पोहचली. आणि पुसेगाव व खातगूण प्रसिद्धीस आले.
*प्रा.संभाजी लावंड वाई*

error: Content is protected !!