घाटनांद्रेत’आनंदाच्या शिधेचे’वाटप

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे /वार्ताहर(जालिंदर शिंदे)-घाटनांद्रे(ता कवठेमहांकाळ)येथील कुलदीप तानाजी शिंदे संचलित स्वस्तधान्य दुकानात शिधापत्रिका धारकांना ‘आनंदाचा शिधा’ या किटचे वाटप उपसरपंच सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शिधापत्रिकाधारकासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने यावर्षी जाहीर करण्यात आल्यानुसार शिधापत्रिका कार्डधारकांना दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर १०० रूपयात चनाडाळ,साखर,खाद्यतेल,रवा या चार वस्तू प्रत्येकी एक किलो प्रमाणे आसणार्या ‘आनंदाचा शिधा’ या कीटचे वाटप करण्यात आले.या योजनेंतर्गत येणाऱ्या सुमारे तीनशे शिधापत्रिका धारकांना सदर किटचा लाभ मिळणार आहे.किटचे वाटप अद्यापही सुरु आहे.या किटमुळे शिधापत्रिका धारकांच्यातून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.यावेळी उपसरपंच सुरेश पाटील,प्रविण (तात्या) शिंदे,वितरक कुलदीप शिंदे,सुरेश कुंभार,सुनिल लहू शिंदे,सुरेश शिंदे,गणेश जाधव,धनंजय पवार,संतोष पवार,राहुल पवार,अधिक शिंदेसह शिधापत्रिकाधारक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!