खरसुंडी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ शेखर निचळ यांचे आमरण उपोषण

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे प्रतिनिधी(राजु शेख)खरसुंडी येथील शेखर सोमनाथ निचळ हे श्री सिध्दनाथ देवालयासमोरील मुख्य प्रवेशध्दाराजवळील अतिक्रमण हटविण्यासाठी बेमुदत आमरण उपोषणास चालु असुन मंदिर समोरील आणि मुख्य पेठेतील अतिक्रमण हटवण्यासंदर्भात खुले व्हावे औंध संस्थानाच्या पूर्वीच्या नकाशाप्रमाणे दोन्ही दिपमाळे संपूर्ण दिसाव्यात दीपमाळी औंध संस्थानाच्या काळातील पूर्वीच्या नकाशाप्रमाणे दिसाव्यात मुख्य प्रवेशद्वारा समोरील जी मुख्य पेठ 1985 सालीच्या सिटीसर्व्हे अगोदर पूर्वीप्रमाणे औंध संस्थानाच्या काळात ज्या होत्या त्याप्रमाणे खुल्या करून मिळाव्यात अधिकृत बांधकाम अतिक्रमण प्रवेशद्वारा समोरील त्वरित निघावेत सावलीसाठी केलेल्या छत संपूर्णता त्यांच्या घराच्या आत असावेत मुख्य बाजारपेठेतील सर्व मिळकती व सर्व प्रॉपर्टी कार्ड हे महाराष्ट्र शासन वर्ग ब आहे.त्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाचा कब्जा आहे त्यामुळे महाराष्ट्र शासन अधिनियम कलम 52 अन्वये थेट कारवाई करण्याचा अधिकार ग्रामपंचायत तिचा आहे तरीही ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व अतिक्रमण काढून घेतल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही असे शेखर निचळ यांनी सांगितले.

error: Content is protected !!