खातगुण येथील जि.प.शाळेचे मुख्याध्यापक गुरुवर्य लालासो शेख यांचा आदर्श – मा.बाळकृष्ण जोशी

मुख्याध्यापकांच्या कारकिर्दीमध्ये खातगुण मधील जि.प.शाळामध्ये विद्यार्थ्यी संख्या सातशेच्या पुढे वाढत होती.परिणामी एकोणीशे त्र्याहात्तर साली मराठी शाळेची विभागणी झाली.शाळा नंबर दोन श्री भैरवनाथ मंदिराच्या आसपास असणाऱ्या मोकळ्या खोल्यामधुन भरत असे.त्या काळात या सर्व खोल्या बंदिस्त व अडगळीत पडुन होत्या.आत मध्ये उंदरांचे साम्राज्य असुन पाण्याने सर्व भिंतीवर ओलसर थेटा चढला होता.आणि दुर्गंधी ही वाढली होती.फक्त दोन भिंगरोली कवलाच्या इमारती मात्र चांगल्या सुव्यवस्थित,होत्या.त्यातील एक इमारत ऑफीससाठी व शेजारचा वर्ग हा सातवी साठी वापरायचे नियोजन केले गेले.आमचे नशिब बलवत्तर होते,कारण दोन नंबर शाळेमध्ये लालासो शेख,गुलाबराव साठे, इनामदार गुरुजी, शेख, आवळे,वजरींकर बाई हे चांगले गुरुजन लाभले होते.मात्र माझे सर्व सवंगडी वरच्या शाळेत राहिले.व इतर मुलांसोबत मी शाळा नंबर दोन मध्ये दाखल झालो.नव्या जोमाने शाळा चालवायची असेल तर निदान प्राथमिक मुलांच्या आरो ग्याची सुविधा असणे महत्वाचे असते. दुर्दैवाने त्या नव्हत्या.त्या उपलब्ध करुन शाळेला ऊर्जिता वस्था कशी आणता येईल म्हणुन गुरुजनांची जीवघेणी तळमळ आम्ही विद्यार्थी जवळुन पहात होतो.राजाराम सस्ते आणि पांडु रंग पाटील,हे कायम स्वरुपी गाव च्या तालमीत गप्पा मारत बसा यचे. यांना लोकमांन्य टिळकांच्या जयंती निमित्त शाळेत बोलावले होते.शाळेत लोकमांन्य टिळकांचा फोटोही नव्हता ही खंत शेख गुरु जींच्या मनाला खूप लागली होती. त्यांनी थोरांची ओळख या पुस्तका तील टिळकांचे चित्र वरच्या बाजुला येईल असे पुस्तक दुमडुन टेबला वरील खुर्चीला सुतळीने बांधले. विद्यार्थ्याच्या उपस्थितीत पांडुरंग पाटील व राजसस्ते यांच्या हे कार्यक्रमाच्या वेळी लक्षात आणून दिले.पण शेख गुरुजी मात्र निराश झाले होते.एक दिवस शाळा सफाईसाठी शेख गुरुजींनी सर्व वर्ग इयत्ते नुसार वाटुन दिले.आम्ही मुलांनी केरसुणी व खरा ट्याच्या सहाय्याने सर्व खोल्यांचे कानेकोपरे झाडुन घेतले.मुलींनी शाळेच्या झिज लेल्या,उखनलेल्या भिंती ओल्या मातीच्या गोळ्याने लिंपुन घेतल्या, व पोतेऱ्याने उभ्या कुडवी सारवुन ही घेतल्या. सर्व मुलींनी गाई म्हैशींच्या शेणाने वर्गातील आतले व बाहेरचे आवार सारवुन लख्ख केले.मुलांनी आती ल भिंतींना रंग दिला.वर्गात अभ्यास क्रमातील तक्ते लावुन घेतले.काही वर्गात फळे नव्हते ते उपलब्ध करुन घेतले. पहिली ते सातवीचे सर्व वर्गाची स्थिरस्थावर झाल्यावर शाळेला बऱ्यापैकी सुरुवात झाली.शेख गुरुजी तड फदार व अपटुडेट स्वभावाचे होते.त्यांचे सहज बोलणे उत्साही प्रेरणा दायी होते.इ.पाचवी ते सातवी पर्यंतच्या इंग्रजी भाषेचे खरे आकर्षण मुलांच्यात विक सित केले होते. मुले अक्षरे जुळ वुन इंग्रजी वाचत होती.जे चुकत होते त्यांना ते तीन वेळा समजुन सांगत होते.शिवाय आम्ही मुले इंग्रजीत सह्या करायला शिकलो. त्यामुळे आत्मविश्वास वाढीस लागला.मुळचा स्पष्ट बोलण्याच्या स्वभावामुळे ते गावात प्रसिद्ध होत होते.साठे गुरुजींचे फौटंन पेनचे अक्षर मोत्यालाही लाजवेल इतके सुंदर होते.कडक इस्त्री केलेला पांढरा लेंगा पांढरी स्वच्छ पैरण व गळ्यात काळा मफलर व पायात कोल्हापुरी चप्पल पेहरा वात शिस्ती बरोबर आपलेपणा वाटायचा.त्यांचे स्वतःच्या सायक ली वर खुप लक्ष असायचे.इनाम दार गुरुजी पांढरी शुभ्र पैरण व धोतर परिधान करुन स्वच्छ उच्चार करुन शिकवायचे. गुलाल नेहमी त्यांचे कपाळावर शोभुन दिसायचा.श्री साठे गुरुजीं नी जगी ज्यास कोणी नाही ही नवीन प्रार्थ ना शोधुन काढली.श्री भैरवनाथ मंदिराच्या मधल्या मैदानात प्रार्थ नेचे स्वरआकाशाला गवसनी घाल त होते.सर्व विद्यार्थी ती प्रार्थना मनापासून व उच्च स्वरात गाताना श्रीराम मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांपैकी बाळकु भगत हे नेहमी ऐकायला यायचे.शेख गुरुजीं आता इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांकडे अंतर्बाह्य सतत लक्ष पुरवु लागले. सहामाही परीक्षेच्या अगोदरच त्यांनी रात्र अभ्यासिका सुरु करण्याचे ठर विले.त्यासाठी मुलें, मुलींना व पालकांना विश्वासात घेतले‌.त्या वेळचे मुलें व मुली शारिरीक दृष्ट्या मोठी होती.शेख गुरुजींनी सर्व विद्यार्थ्यांच्या मनात पुज्य भाव निर्माण केल्यामुळे श्रद्धेचे व आत्मविश्वासाचे वातावरण शाळे भोवती व पालकांत निर्माण झाले होते.श्री राम मंदिरांतील विश्वस्तां ना स्वतःभेटुन लाईटची व्यवस्था केली.आणि वर्गातील वर्षानुवर्षे असलेलाअंधार नाहीसा केला. मुला व मुलींचे रात्रीचे तास सुरु होऊ लागले.फक्त मुलांना आपा पले अंथरुण व पांघरुन घेऊन रात्र अभ्यासिकेला आरंभ केला. अशो क गायकवाड,शामराव लावंड, सतीश महादेव लावंड,आनंदराव एकनाथ लावंड. रमेश गोविंद लावंड. दिलीप तुकाराम लावंड, जयवंत लक्ष्मण लावंड,भरत बापू भुजबळ, किसन दळवी, राजेंद्र माने, विजय माने,कोंडीबा साव काराचा भाग्या, सुभाष (डाळ्या ) यादव, देवगिरी गोसावी,सतीश पोतदार. रामदास गोरे.इ.मुले अत्यंत हुशार व कर्तबगार होती. अशोक गायकवाड याला कोण ताही प्रश्न गुरुजींनी विचारला की, तो डोळे बंद करुन गाल पसरुन फक्त हसायचा.पिशाच्च असे त्याला टोपण नाव पडले होते. किसन दळवी शाळेत रात्री झोपल्यावर एकदा अशोकने यांच्या गालावर जी थप्पड मारली तो वळ एक महिना जसाचा तसा राहीला होता. भाग्या दगडातला दगड पण गुरुजींनी त्याला चांगला आकार दिला.हुशार मुलांत त्यांचे रुपांतर झाले सायंकाळी शेख गुरुजींचे गणिताचे व इंग्रजी विषयाचे जादा तास होत असत. आठ ते अकरा कधी साडेअकरा वाजत.वर्गातील मुलींना गुरुजी स्वतः कंदिलाच्या उजेडात प्रत्येक मुलींच्या घरी जाऊन पोहचवत होते.व सोबत लळा लावणाऱ्या मुलांसोबत पुन्हा शाळेत येत होते.दररोज सायंकाळी शेख गुरुजी लेहंगा व साधा शर्ट परि धान करुन व गळ्यात टावेल अडकवून येरळा नदीकाठी धरणा च्या बाजुला मिश्री घासत निघा यचे.आडवे शरिर व तल्लख बुद्धी व भविष्याचा वेध घेणारी नजर सहज समोरुन आलेल्या कोणत्या ही व्यक्तींच्या काळजात आदर निर्माण करायची.नेमके याच वेळी तुकाराम यादव,अशोक यादव, दशरथ यादव,गौतम यादव, श्याम यादव, बबन यादव,मच्छिंद्र यादव हे धरणाच्या बाजूने यायचे.
संथ वाहणाऱ्या येरळा नदीच्या किनारी समृध्द असे विचार मंथन करीत बसायचे.या वेळी तुकाराम यादवांच्या प्रतिभेला नुकतेच पंख फुटत होते.शेख गुरुजींनी त्याची प्रतिभा व कवित्वशक्ती जागृत केली. तुकाराम यादवांचे व्यक्ती मत्व सुभाषचंद्र बोस सारखे होते. उंचापुरा मजबुत देहबांधा डोईवर विपुल केशसंभार व डोळ्यावर आकर्षक चष्मा शोभुन दिसायचा. बोलताना ऐकत रहावे अशी दर्जे दार भाषाशैली त्यांच्या देह बोलीत उठून दिसायची.अनेक कविता रचल्या या पाठीमागं शेख गुरुजी ची इच्छा शक्ती कार्यरत होती.या सर्व कवितांना श्याम यादव उत्कृष्ट चालीत गायचा. त्याचे गायन येरळा नदीच्या काठावर गुरुजींच्या सहवासात घडुन यायचे.त्याची बैठक कडुस पडत आल्यानंतर विसर्जित व्हायची. आता गावात गणपती बसवण्याचे वारे वाहू लागले होते. शाळा नंबर दोनमध्ये शेख गुरुजींनी पहिला गणपती बसवला.आणि तुकारामां नी रचलेल्या सर्व कविता आधु निक चाली लावून कला पथकात सादर करावयाच्या असे मनोमन ठरवले.या साठी माझी संभाजी लावंड,भरत बापु आवळे, राजा राम नामदेव यादव,विजय मारुती लावंड,विनोद सोपान लावंड,यांची निवड केली.त्या सर्व कविता आम च्या पाठ झाल्या होत्या.अति तेथे माती या एकांकिकेत भरत बापु भुजबळ,सुभाष यादव,भागवत यादव शामराव रामचंद्र लावंड. राजेंद्र माने यांची अचुक निवड व नियोजन केले.श्री हनुमान
व्यायाम मंडळाने तालमीच्या पुढे स्टेज उभारले होते.संजय माने रणजित माने,युसुफ पहिलवान, एकनाथ भोसले,वल्ल्या ,सक्का नानांच्या नंदू सर व नामदेव सुतार यांनी विशेष असे प्रयत्न केले.ज्या दिवशी हा कला पथकाचा कार्य क्रम सादर होणार होता.त्याच दिवशी प्रा.शिव शंकर उपासे सर खास तुकारामांनी चालीत रच लेल्या कविता ऐकावयास खटाव वरुन प्रा.सुरेश शिंदे सोबत आले होते.हा कार्यक्रम चांगला झाला. या कार्यक्रमात स्वतः तुकाराम हार्मोनियम वाजवित होते तर विजय पाटील ढोलकीवर हात चालवत होते.तीन तासांच्या कार्यक्रमात बुटकाच्या जगूने वेड्याची भूमिका हुबेहूब वठवली होती.आणि अति तेथे माती या एकांकिकेतील भरत भुजबळांची राजाची भुमिका एक नंबर गाज ली.पंतप्रधानाची भुमिकेत शामराव लावंड यांच्या कोण आहे रे तिकडे या वाक्याने हशा पिकायचा.आणि मोठ्या मुलींचे किती सांगु मी सांगु कुणाला हे टिपरी नृत्य फार च चांगले झाले.शेख गुरुजींच्या अथक प्रयत्नांनी शाळेला वैभवाचे दिवस मिळवून दिले.कारण त्या व र्षी शाळा नंबर दोनचा तालुक्यात केंद्रावर पहिला क्रमांक आला.पण दोन घटनेचे मला अजुनही खुप दुःख होत आहे. आज गुरुजी हयात नाहीत.ते पैगबरवाशी झाल्याचेआज मला नव्याने समजले.आणि मी माझ्या आतील हुंदक्यांना वाट मोकळी करुन दिली.दुसरी गोष्ट अशी की तुकाराम यादवांच्या कविता
नाहीशा झालेल्या आहेत. त्या कोणाकडेही नाहीत.खुद्द तुका राम यादवांचेकडे सुद्धा नाहीत.या कविता येरळा नदीने ऐकलेल्या आहेत.पण ती नदीसुध्दा कालची राहिली नाही.एका महान व थोर कविला मी पारखा झाल्याचे दुःख आज सुध्दा मला अस्वस्थ करत आहे.
प्रा.संभाजी लावंड.खातगुण

error: Content is protected !!