सोसायट्या या राजकारण विरहीत समाजकारणातुन उभ्या राहील्या पाहीजेत – मा.सुरेश (भाऊ) पाटील

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- गावातील सहकारी विकास सोसायट्या या राजकारण विरहीत राहून त्या समाजकारणातुन उभ्या राहील्या पाहीजेत असे उदगार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश (भाऊ) पाटील यांनी काढले.ते घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील ग्रामविकास सोसायटीच्या नुतन इमारतीच्या भूमीपूजना निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन प्रल्हाद (आण्णा) शिंदे होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की संस्थेची इमारत केवळ मोठी असुन उपयोग नाही तर ती जनसामान्यांना मोठे करणारे मंदिरे बनले पाहिजे.तर गेली कित्येक वर्षे आहे त्याच जुन्या इमारतीत संस्थेचा कारभार चालू होता.आसपास प्रत्येक गावात ग्रामविकास सोसायटीच्या स्वताच्या प्रशस्त इमारती झाल्या आहेत,तशी आपल्याही संस्थेची इमारत असावी या एकमेव उद्देशाने बीव्होटी तत्वावर सुमारे २८ लाख रुपये निर्धारित खर्चाची ही इमारत उभी रहात आसल्याचे माजी सरपंच अमर शिंदे यांनी यावेळी सांगितले.
तर अध्यक्षस्थांनावरून बोलताना संस्थेचे चेअरमन प्रल्हाद (आण्णा) शिंदे म्हणाले की होणारे अनेक विरोध डावलून माझ्या कार्यकालात संस्थेची ही देखीणी इमारत उभी रहात आहे ही माझ्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट असुन,त्यानी घाटनांद्रे गावाची गैरसोय टाळण्यासाठी गावासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेची मागणीही यावेळी केली त्याला सर्वानी टाळ्यांच्या गजरात मान्यता दिली.प्रारंभी उपस्थित महिलांच्या हस्ते धार्मिक विधी पार पाडल्यानंतर सुरेश (भाऊ) पाटील यांच्या हस्ते विधीवत नियोजित संस्थेच्या इमारतीचे भुमीपुजन करण्यात आले.
यावेळी व्हा चेअरमन उमराव शिंदे संचालक सर्वश्री बापुसाहेब भिमराव शिंदे,महादेव शिंदे,मानसिंग झांबरे,रामचंद्र शिंदे,रमेश पाटील,जालिंदर चव्हाण,सदाशिव गुरव,ज्ञानू कांबळे,विजय शिंदे,बापुसाहेब शिवाजी शिंदे,शांताबाई शिंदे,कमल शिंदे,सचिव राजेंद्र पाटीलसह उपसरपंच सुरेश पाटील,तिसंगीचे माजी सरपंच वामन कदम,उपसरपंच शरद जाधव,कुंडलापुर सोसायटीचे चेअरमन दिपक चव्हाण,माजी चेअरमन तुकाराम शिंदे,माजी सरपंच विष्णू पवार,संजय प्रभाकर शिंदे,संतोष पाटील,कुलदीप शिंदे,लालासाहेब शिंदे,शशिकांत शिंदे,सचिन शिंदेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वागत अमर शिंदे यांनी तर आभार महादेव उर्फ एकनाथ शिंदे यांनी मानले.

error: Content is protected !!