स्पर्धा परीक्षांकडे युवकांनी वळावे-मा.अमोल मांढरे

नवचैतन्य टाईम्स वाई प्रतिनिधी(अमोल मांढरे)-आपला देश हा सबंध जगात एक युवाशक्ती आदर्श राष्ट्र म्हणून ओळखला जातो. हीच आपली आजची युवा पिढी उद्याचे देशाचे आधारस्तंभ आहेत. पूर्वीपासूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श स्वराज्याची परंपरा आजही टिकवून ठेवणे हे आजच्या आपल्या युवा पिढीचे आद्य कर्तव्यच आहे. यासाठीच आजच्या आपल्या युवा पिढीच्या हाती उद्याच्या भविष्याची सूत्रे आहेत. आणि आज आपल्या याच युवा पिढीला प्रेरणा व शक्ती स्थान देण्यासाठी आपले आजचे लोकप्रतिनिधी, समाजातील जाणकार नागरी व विविध शिक्षण संस्था यांनी पुढे येऊन परिपूर्ण कार्य करणे गरजेचे आहे. आजच्या युवकांसमोर त्यांच्या भविष्यातील उत्तम करिअर साठी विविध क्षेत्रे आव्हान म्हणून उभी आहेत. आणि याच आपल्या युवा पिढीने प्रामुख्याने स्पर्धा परीक्षकांकडे स्वतः पुढे येऊन गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. आपली प्राचीन काळापासून असलेली आदर्श भारतीय संस्कृती,आयुर्वेद, योगाभ्यास, विविध आदर्श शिक्षण संस्था त्याचबरोबर आदर्श गुरु शिष्य परंपरा या सर्वांचा आदर्श युवा पिढीने मनात ठसून स्पर्धा परीक्षांमध्ये आपले उज्वल भवितव्य घडवावे. यापूर्वी मागील काळात स्पर्धा परीक्षांमध्ये मर्यादित क्षेत्रे उपलब्ध होती. परंतु आजच्या वाढत्या जागतिकीकरणात
आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विविध क्षेत्रे युवकांना खुणावत आहेत. तेव्हा या सोनेरी संधीचा फायदा घेऊन युवकांनी स्वतःच स्वतःचे शिल्पकार होऊन स्पर्धा परीक्षकांकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. विशेषतः आपल्या मराठी युवकांनी स्पर्धा परीक्षांचे आव्हान स्वीकारून उज्वल भवितव्य घडून लोकसेवा हे एकमात्र उद्दिष्ट समोर ठेवणे गरजेचे आहे. आपले महाराष्ट्र राज्य ही थोर संतांची पवित्र भूमी मानली जाते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मातोश्री जिजाबाई, त्याचबरोबर महात्मा ज्योतीराम फुले, सावित्रीबाई फुले आणि अनेक स्वातंत्र्यवीरांची जन्मभूमी यांनी कर्मभूमी ने त्यागाची आणि पावित्र्याच्या स्पर्शाने पावन झालेल्या भूमीचा आदर्श युवकांनी कायम ठेवायला हवा. उत्तम आर्थिक वेतन, समाजात प्रतिष्ठा आणि लोकसेवा करण्याची संधी ही तीन सूत्रे युवकांनी मनात बिंबवून लोकशाहीची जाण, अनेक विषयांचा सखोल अभ्यास, आणि धडपडी वृत्ती अशी गुणवत्ता असणारा युवकांनी स्पर्धा परीक्षांची जोरदार तयारी करावी. आपल्या समृद्ध महाराष्ट्र राज्याला आदर्श ग्रामीण भागाची ओळख आहे. त्याचबरोबर आपला बळीराजा आणि वीर जवानांचे महात्म्य ही युवकांनी मनात जोपासणे व नंतर आपल्या आयुष्यात त्यांची सेवा करून त्यांचे ऋण फेडणे हे युवकांचे कर्तव्यच आहे. यासाठीच आजच्या आपल्या विद्यार्थ्यांची शालेय स्तरापासूनच स्पर्धा परीक्षांची ओळख करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी आपला आदर्श इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र आपले परराष्ट्र धोरण आपली प्रशासकीय यंत्रणा,आपली माय मराठी भाषेची परिपूर्ण ओळख त्याचबरोबर वाघिणीचे दूध असलेल्या इंग्रजी भाषेची सखोल माहिती घेऊन विद्यार्थ्यांची उत्तम व्यक्तिमत्व घडवावे. जर शालेय स्तरापासून हा उत्तम पाया विद्यार्थ्यांचा झाला तर भविष्यात स्पर्धा परीक्षांमध्ये आपले मराठी विद्यार्थी नक्कीच यशस्वी होताना दिसतील. सध्या केंद्र शासनाने ही नवीन शिक्षण व्यवस्था अमलात आणली आहे. त्यामध्ये विद्यार्थी आपल्या आवडीच्या विषयांमध्ये आपली भविष्यातील उत्कृष्ट करिअर करू शकतात. ही खरोखरच आपल्या शिक्षण व्यवस्थेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अतिशय योग्य आहे. आणि विशेष बाब म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होणाऱ्या आपल्या युवकांनी केवळ उत्तम आर्थिक वेतन आणि प्रतिष्ठा या बाबी तर लक्षात ठेवणे गरजेचेच आहे परंतु त्याचबरोबर समाज व राष्ट्रहितासाठी हेच एक मात्र उद्दिष्ट ठेवून आपले आयुष्य व्यतीत करावे. सध्या स्पर्धा परीक्षांमध्ये शहरी भागाबरोबरच ग्रामीण विद्यार्थ्यांचेही विशेष प्राविण्य दिसून येत आहे. ही खरोखरच आपल्या समाजासाठी एक हिताची गोष्ट आहे. सध्या आपल्या समाजात स्पर्धा परीक्षांचे विविध क्लासेस, शिक्षण संस्था आणि विविध महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन अतिशय उत्तम पद्धतीने दिले जात आहे. परंतु परराज्यातील युवक वर्ग या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊन वरिष्ठ पातळीवर त्यांचीच संख्या जास्त प्रमाणात दिसून येते. आणि आपले मराठी विद्यार्थ्यांचे प्रमाण अतिशय नगण्य आहे बुद्धिमत्ता आणि कष्टामध्ये आपली युवक काही कमी नाहीत. परंतु आपले मराठी युवक वर्ग हा इतर अनेक प्रलोभनात आणि राजकीय क्षेत्रात गुंतून पडल्याने स्वतःचे शैक्षणिक आणि मानसिक नुकसान करून घेत आहेत. तेव्हा याचे गांभीर्य ओळखून पालक व विद्यार्थी आणि शिक्षण संस्था यांनी त्रिसूत्री कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरसाठी प्रबोधनात्मक मार्गदर्शन होणे अत्यंत गरजेचे आहे. आपले युवक वर्गाने स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झाल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही आर्थिक व राजकीय प्रलोभनाला अथवा दबावाला बळी न पडता स्वच्छ व आदर्श जीवन चरित्र जोपासून लोकहितासाठी कार्य करावे. सध्या पूर्वीपेक्षा आजच्या विद्यार्थी वर्गाला स्पर्धा परीक्षा ची तयारी करताना विविध अभ्यासक्रम हे आजच्या सोशल मीडिया व इंटरनेटमुळे सहज उपलब्ध होत आहेत. आणि याचाच आपल्या विद्यार्थ्यांनी योग्य तो फायदा घेऊन स्पर्धा परीक्षांमध्ये जोरदार तयारी करून आपले यशस्वी भवितव्य घडवावे. काही युवक वर्ग स्पर्धा परीक्षा ची तयारी करतातच, परंतु काही वेळा त्यांना अपयशही सामोरे येते. तेव्हा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणे म्हणजे आपले समाजातील यशस्वी व्यक्ती ही कधी ना कधी अपयशाला सामोरे गेलेल्या होत्या. तेव्हा त्यांनी अपयशाला सामोरे जाऊन आपल्यालाही योग्य मार्ग मिळेल हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आणि अपयशाची लाज न बाळगता व टीकेकडे दुर्लक्ष करून पुन्हा एकदा गरुड झेप घेत विद्यार्थी वर्गाने स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होणारच ही गाठ बांधणे गरजेचे आहे. आपल्याला स्वातंत्र्य काही सहजपणे मिळालेले नाही यात आपल्या अनेक महापुरुषांचा त्याग व बलिदान अनेक वीर जवानांचे महात्म्य आहे. हे आपल्या युवक वर्गाने विसरून चालणार नाही. तेव्हा युवक वर्गाने पाश्चिमात्य संस्कृतीच्या आणि इतर प्रलोभनाला बळी न पडता आपल्या आदर्श भारतीय संस्कृती व आपला इतिहासाचा अभ्यास करून आपले व्यक्तिमत्व घडवावे. आणि युवक वर्गाने ही स्पर्धा परीक्षा ची तयारी करताना केवळ पुस्तकी ज्ञान न जोपासता आपली शारीरिक व मानसिक याचाही परिपूर्ण विकास करावा. आणि हेच उद्याच्या भविष्यात विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करताना आधारस्तंभ राहतील. आपल्या युवक वर्ग स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झाल्यानंतर देशातील विविध क्षेत्रात आणि विविध पदांवर काम करण्याची उत्तम संधी मिळेलच. तेव्हा त्यांनी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे आपल्या आई-वडिलांचा आदर,गुरू बद्दल श्रद्धा आणि आपण सर्वसामान्यांसाठी आणि त्याच्या प्रश्नांसाठी सदैव कार्यरत आणि आपल्या भारत मातेचे ऋण कायम लक्षात ठेवून आज स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेली विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांनाही बहुमूल्य मार्गदर्शन करीत असतात. आणि आपण सर्व नागरिकांनीही स्पर्धा परीक्षकांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या बुद्धिमत्तेला व कष्टाला योग्य तो वाव आणि आदर द्यावा. त्यामुळे इतर विद्यार्थीही स्पर्धा परीक्षकांकडे आकर्षित होतील.तेव्हा आपण पत्रकार बांधवांनीही आपल्या लेखणी द्वारे विविध माध्यमातून स्पर्धा परीक्षांची उत्तम आणि सखोल माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून आपले कर्तव्य पार पाडावे. आपल्या महाराष्ट्र राज्याला असलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श स्वराज्याची ओळख आजची आपली विद्यार्थी स्पर्धा परीक्षा मध्ये यशस्वी होऊन ती कायम ठेवतील. यात तीळ मात्र शंका नाही. आजच्या आपल्या युवा पिढीला स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी, आणि भविष्यात विविध माध्यमातून लोकसेवेचे कार्य करण्यासाठी मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
तेव्हा मी एक पत्रकार व साहित्यिक म्हणून आपले आद्य कर्तव्य समजून आजच्या आपल्या या युवा पिढीला स्पर्धा परीक्षा चे महत्व सांगतो आहे.
धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.
लेखक. कविराज अमोल मांढरे वाई जिल्हा सातारा.
Mobile no.7709246740..

error: Content is protected !!