घाटमाथ्यावर पीक पंचनामे करण्यास सुरुवात बळीराजाकडून सरसकट पंचनाम्याची मागणी

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर/(जालिंदर शिंदे)-कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रेसह घाटमाथ्यावरील तिसंगी,वाघोली,गर्जेवाडी ,कुंडलापुर,जाखापुर व कुची परीसरात सप्टेंबर,ऑक्टोबर मध्ये परतीच्या पावसाने झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी विभागामार्फत करण्यास सुरुवात झाली आहे.बळीराजा मात्र सरसकट पंचनाम्याची मागणी करत आहे.
तहसीलदार बी जे गोरे यांच्या आदेशानुसार सप्टेंबर,ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने कवठेमंहाकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यासह तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे.शासकीय आदेशानुसार फक्त प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यात येत आहेत.नुकसान ग्रस्त खरीप पिकांचे सरसकट पंचनामे केले जावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.मात्र सध्या आदेश वस्तुनिष्ठ पंचनामाचे आहेत असे तालुका कृषी विभाग व महसूल विभाग यांचेकडून सांगण्यात आले आहे.त्यामुळे वस्तुनिष्ठ पंचनामे स्वरूप आहेत.तरी ज्या शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांनी तलाठी,कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून आपला प्रत्यक्ष प्लॉट दाखवावा असे आवाहन कृषी व महसूल विभाग यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!