जल जीवन मिशन अंतर्गत खरसुंडी गावासाठी एक कोटी ७९ लाख रु.निधी मंजुर

नवचैतन्य टाईम्स खरसुंडी प्रतिनिधी(राजु शेख)-खरसुंडी येथे जल जीवन मिशन अंतर्गत खरसुंडी गावासाठी एक कोटी 69 लाख निधी मंजूर झालेला आहे त्यांचे पाईपलाईन काम चालू आहे तसेच त्यामध्ये तीन पाण्याच्या टाक्या मंजूर आहेत यासाठी टाकी बांधण्यासाठी जागेची गरज होती तर त्या साठी किशोर उत्तम पुजारी रामचंद्र गंगाराम केंगार व अमोल भगवान पुजारी व बालाजी गुरव यांनी प्रत्येकी एक गुंठा जागा देऊन ग्रामपंचायत सहकार्य केले आहे आज पहिल्या पिण्याच्या पाणी टाकीचे उद्घाटन झाले पिण्याच्या पाण्याच्या टाकीसाठी मोफत जागा दिली त्या सर्वांचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत च्या वतीने जाहीर आभार मानले या कार्यक्रमास उपस्थित प्रथम लोक सरपंच लता अर्जुन पुजारी माननीय उपसरपंच जितेंद्र पाटील दिलीप जानकर विजयकुमार भांगे मोहन शिंदे सुवर्ण पुजारी सलीमा शिकलगार नंदिनी केंगार नितीन पुजारी उपविभागीय ग्रामीण पाणीपुरवठा एन एस ठाकूर साहेब एस जी शेख सहाय्यक अभियंता तसेच देवस्थानचे विश्वस्त महादेव सावकार ग्रामस्थ धनंजय सावकार सचिन सावकार वैभव पुजारी विकास पुजारी सादिक शिकलगार मोहन भोसले देवकते उपस्थित होते सदर काम हे जलजीवन मिशन अंतर्गत कामामुळे गावातील सर्व वाडी वस्ती मध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे

error: Content is protected !!