ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजल्याने हालचालींना वेग,नेते राजकीय समीकरण जुळविण्यात तर इच्छुक गाठीभेटीत व्यस्त

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर/(जालिंदर शिंदे):-बुधवार दि.९ रोजी निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.या पार्श्वभूमीवर कवठेमंहाकाळ तालुक्यातील २९ ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकांचा धुमधडाका लवकरच सुरू होणार आहे.आता राजकीय हालचालींना वेग आला आहे.राजकीय तसेच गटातटांची समीकरणे जुळवण्यास सुरवात झाली आहे.त्याचबरोबर इच्छुकांनी छुप्या बैठका घेण्यासही सुरुवात केली आहे.
ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केला.त्यानुसार १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.अर्ज दाखल करण्यासाठी २८ नोव्हेंबरपासून सुरवात होणार आहे.कवठेमंहाकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावरील कुची,जाखापुर,वाघोली व घाटनांद्रे या चार गावांसह २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत आहे. मावळत्या वर्षातच या निवडणुका पार पडणार आहेत.गाव पातळीवर ग्रामपंचायत निवडणूक ही प्रतिष्ठेची असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस,भाजपा,काँग्रेस,शिवसेना,स्थानिक आघाड्या,घोरपडे गट,सगरे गट यातील राजकीय नेते,कार्यकर्ते ग्रामपंचायतवर आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी तयारीला लागले आहेत.गावोगावी प्रभाग निहाय उमेदवार चाचपणीसाठी बैठका सुरू होत आहेत.इच्छुकांनीही संबंधित वार्डात आपला संपर्क सुरू केला आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व मिळविण्यासाठी स्थानिक नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावून काम सुरू केले आहे.तर स्थानिक नेते त्याचबरोबर विविध पक्षाचे वरिष्ठ नेतेही जोमाने कामाला लागले आहेत.तालुक्यावर आपले राजकीय वर्चस्व ठेवण्यासाठी आमदार गट,खासदार गट त्याचबरोबर घोरपडे गट यांच्यातच प्रमुख चुरस पहावयास मिळणार आहे.
.ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक चा कार्यक्रम हा पुढील प्रमाणे —–
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणुकीची नोटीस दि.१८ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.अर्ज भरण्याची मुदत दि.२८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत ११ ते ३ या वेळेत सुरू राहणार आहे.दि.५ डिसेंबरला ११ वाजल्यापासून अर्जाची छाननी सुरु होणार आहे.दि. ७ डिसेंबर रोजी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत असणार आहे.यानंतर चिन्हे वाटप होईल व दि.१८ डिसेंबर रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे.दि.२० डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.घाटमाथ्यवरील कुची, जाखापुर,वाघोली व घाटनांद्रे येथील प्रभाग,जागा व मतदार संख्या या पुढीलप्रमाणे घाटनांद्रे- (०३),(९),(२७११) जाखापूर -(०३),(१०), (१९११)वाघोली -(०३)(०८),(७८९)कुची(०५),(१३),(४५००)
कवठेमहांकाळ तालुक्यातील ज्या २९ ग्रामपंचायतीच्या निवडणूकी या पहिला टप्प्यात होणार आहेत त्या पुढील प्रमाणे:-अलकुड (एस),नरसिंहगाव(लांडगेवाडी),लोणारवाडी,शिरढोण,रांजणी,कोंगनोळी,शिंदेवाडी(हिं),हिंगणगाव,कुकटोळी,विठुरायाचीवाडी,सराटी,हरोली,खरशिंग,जायगव्हाण,अलकुड(एम)मळणगांव,बोरगाव,ढालेवाडी,चुडेखिंडी,लंगरपेठ,आरेवाडी,वाघोली,आगळगांव,घाटनांद्रे,जाखापुर,केरेवाडी,कुची,शेळकेवाडी व नागज यांचा समावेश आहे.

error: Content is protected !!