संत ज्ञानेश्वरांची यशोगाथा

🌴 नवचैतन्य टाईम्स ठाणे प्रतिनिधी(सचिन शिंदे)
🌻 *सार्थ ज्ञानेश्वरी*
🌴 *अध्याय ११ वा*
🌻 *।विश्वरूपदर्शनयोगः।*
🌴 *ओवी ३५१ पासून*
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳

*🌸ज्या मज संहाररुद्र वासिपे । ज्या मजभेणें मृत्यु लपे । तो मी एथें अहाळबाहळीं कांपें । ऐसें तुवां केलें ॥३५१*
     ज्या मला सृष्टीचा संहार करणारा रूद्र भितो, ज्या मला भिऊन मृत्युदेखील तोंड लपवितो. त्या मलाही अत्यंत थरकाप सुटावा, असा विश्वरूप तू झाला आहेस.
*🍂परि नवल बापा हे महामारी । इया नाम विश्वरूप जरी । हे भ्यासुरपणें हारी । भयासि आणी ॥ ३५२ ॥*
     पण याला विश्वरूप हे जरी नाव आहे, तरी भगवंता! ही विलक्षण महामारी आहे. हे विश्वरूप, आपल्या भयंकर विक्राळ स्वरूपामुळे साक्षात भयालाही हार खायला लावणारे आहे.
➖➖➖➖💠➖➖➖
*_🌻नभःस्पृशं दीप्तमनेकवर्णं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् । दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो ॥२४॥_*
अर्थ 👉  _हे विष्णो, गगनाला स्पर्श करणारा, दीप्तिमान, अनेक रंगांनी युक्त, जबडा पसरलेला, दीप्तिमान व विशाल नेत्र असलेला, अशा तुला पाहून ज्याचा अंतरात्मा व्याकूळ झाला आहे असा मी धैर्य धारण करू शकत नाही व शांती देखील धरू शकत नाही._
➖➖➖➖💠➖➖➖
*🌸ठेलीं महाकाळेंसि हटेंतटें । तैसी किती{ए}कें मुखें रागिटें । इहीं वाढोनियां धाकुटें । आकाश केलें ॥ ३५३ ॥*
     तुझी कित्येक कृध्द मुखे, जणू काय महाकाळाशी पैज मारून आहेत, तशी रागीट आहेत, त्यांनी आपल्या विस्तृतपणाने आकाशालाही लहान केले आहे.
*🍂गगनाचेंनि वाडपणें नाकळे । त्रिभुवनींचियाही वारिया न वेंटाळे | ययाचेनि वाफा आगी जळे । कैसें धडाडीत असे ॥ ३५४॥*
     ही अफाट वाढलेली मुखे एवढ्या विस्तीर्ण आकाशातही सामावत नाहीत. त्रिभुवनात वाहणारा वारा देखील त्यांना वेटाळू शकत नाही. त्यांच्या वाफेने अग्नी देखील जळू शकेल, अशी प्रज्वलित आहेत.
*🌸तेवींचि एकसारिखें एक नोहे । एथ वर्णावर्णाचा भेदु आहे । हो कां जें प्रळयीं सावावो लाहे । वन्ह्ं ययाचा ॥ ३५५ ॥*
    त्याचप्रमाणे सर्व मुखे एकसारखी नसून त्यांचे वर्णही भिन्न भिन्न आहेत, जणू काय प्रलयकाली अग्नीला याचेच सहाय्य मिळते.
*🍂जयाचिये आंगींची दीप्ती येवढी । जे त्रैलोक्य कीजे राखोंडी । कीं तयाही तोंडें आणि तोंडीं । दांत दाढा ॥ ३५६ ॥*
     ज्यांच्या अंगाचे तेज एवढे भयंकर आहे की, जे त्रैलोक्याची राखरांगोळी करील. त्यातही आणखी तोंडे असून, त्या तोंडांत भयंकर दाढा दात आहेत.
*🌸कैसा वारया धनुर्वात चढला । समुद्र कीं महापुरीं पडिला । विषाग्नि मारा प्रवर्तला । वडवानळासी ॥३५७॥*
    जणू काय वार्‍याला धनुर्वात झाला किंवा समुद्र महापुरात पडला अथवा विषरूपी अग्नी, समुद्रात असलेल्या वडवाग्नीला मिळून, मारण्याला प्रवृत्त झाला.
*🍂हळाहळ आगी पियालें । नवल मरण मारा प्रवर्तलें । तैसें संहारतेजा या जाहलें । वदन देखा ॥ ३५८ ॥*
      किंवा अग्नीने हलाहल विष प्राशन केले किंवा स्वतः मरणच मारायला प्रवृत्त झाले. त्याप्रमाणे या सृष्टीचा संहार करणार्‍या या अंगाच्या तेजाला, तुझी मुखे आणखी सहाय्यभूत झाली आहेत.
*🌸परी कोणें मानें विशाळ । जैसें तुटलिया अंतराळ । आकाशासि कव्हळ । पडोनि ठेलें ॥ ३५९ ॥*
     पण ही तुझी मुखे कशाप्रमाणे अशी विशाल पसरलेली आहेत, असे म्हणशील, तर ज्याप्रमाणे अंतराळ तुटून आकाशात जणू काय भगदाड पडले। आहे.
*🍂नातरी काखे सूनि वसुंधरी । जैं हिरण्याक्षु रिगाला विवरीं । तैं उघडले हाटकेश्वरीं । जेवीं पाताळकुहर ॥३६०॥*
     किंवा जेव्हा हिरण्याक्ष राक्षस, पृथ्वी काखेत मारून पाताळात जाण्याकरिता समुद्राच्या विवराने शिरला, तेव्हा, ज्याप्रमाणे पाताळातील हिटकेश्वराने पाताळाचे विवर खुले केले.
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳
🌸 *_॥ जयजय रामकृष्णहरि ॥_*
🌿 *_ओवी३६१ पासून उद्या_*

error: Content is protected !!