चला बलशाली भारत राष्ट्र घडवूया

नवचैतन्य टाईम्स वाई प्रतिनिधी(अमोल मांढरे)आपला भारत देश ही आपली मातृभूमी आहे. याच आपल्या देशाला पूर्वीपासून एक आदर्श रामराज्य अशी परंपरा आहे. याच आपल्या भारत देशात अनेक महापुरुषांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ,लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,मातोश्री जिजाबाई, झाशीची राणी, पृथ्वीराज चौहान, सुभाष चंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर त्याचबरोबर भगतसिंग, राजगुरू,सुखदेव सारख्या अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपले आयुष्य वेचून आणि थोर बलिदान देऊन आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. याच आपल्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी स्वतःच्या स्वार्थाला बाजूला ठेवून राष्ट्रहित व समाज हित हे एक मात्र उद्दिष्ट समोर ठेवून अतुलनीय कार्य केलेले आहे. आपला भारत देश हा आजच्या जागतिकीकरणात एक प्रबळ युवाशक्ती राष्ट्र म्हणून ओळखला जातो. हाच आपला युवक वर्ग उद्याचे देशाचे आपले आधारस्तंभ आहेत. तेव्हा सर्व युवकांबरोबरच सर्वांनी एक गोष्ट ध्यानात घ्यावी की आपल्या भारत देशाला हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नाही. तेव्हा याचीही किंमत आपलं सर्वांनी आपल्या हृदयात ठेवून देशासाठी एकजुटीने संघटित होणे आवश्यक आहे. आपली भारतीय संस्कृती,योगाभ्यास, आयुर्वेद, विज्ञान-तंत्रज्ञान ,अनेक पूर्वीपासून चालत आलेली शैक्षणिक विद्यापीठे याची थोर परंपरा आपल्या भारत राष्ट्राला लाभलेली आहे. याच आपल्या देशातला अनेक थोर संतांनी आणि महापुरुषांनी त्यांच्या आदर्श विचारातून जनसामान्यांचे प्रबोधनच केलेले आहे. आजही आपण जागतिकीकरणात एक गरुड झेप घेतलेल्या असली तरी आपल्या संस्कृतीचा जगात आजही आदर तितक्याच ताट मानेने आजही टिकून आहे. तेव्हा याच आपल्या भारत देशाला भविष्यात आपण एक बलशाली राष्ट्र बनवण्याची शपथ घेऊया. तेव्हा महत्त्वाची म्हणजे आपली युवा पिढी, विद्यार्थी ,शेतकरी वीर जवान कामगार वर्ग या सर्वांना आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याची खरी ओळख पटवून त्यांच्या सर्वांगीण विकास करणे हे हिताचे ठरू शकते. आपल्या आदर्श असलेल्या राज्यघटनेत सर्वांना समान अधिकार दिलेले आहेत. तेव्हा याची जाण ठेवून सर्व स्तरातील नागरिकांनी स्वहिता बरोबर समाजातही जोपासावे. आपले सीमेवर आपली वीर जवान रात्रंदिवस पहारा देऊन आपले सर्वांचे संरक्षण करीत आहेत. तेव्हा आपण सर्व नागरिकांनीही त्यांच्याबद्दल अभिमान बाळगून आपले कर्तुत्व पार पाडावे. देशांतर्गत विविध जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन अनेक प्रश्नांचा सामना करावा. त्याचबरोबर देश हिताच्या कार्यात आलेल्या प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन पक्षीय आणि वैचारिक मतभेद बाजूला ठेवून राष्ट्रहित हे एक मात्र उद्दिष्ट समोर ठेवावे. त्याचबरोबर विशेषतः आपले भारत देशातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन परदेशी स्थायिक होण्यापेक्षा आपल्या भारत देशातच राहून जनसेवा करावी. आणि यासाठी शासन स्तरापासून योग्य ती पावले उचलण्यात यावी. आपले जे प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी आहेत त्यांच्या बुद्धिमत्तेचा आदर करावा. त्याचबरोबर मेक इन इंडिया यांसारख्या उत्तम योजना राबवून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावे. आपले युवकांनीही पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रलोभनाला बळी न पडता आपल्या भारत मातेची सेवा करावी. आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन युवकांसमोर एक आदर्श ठेवलेला आहे. आणि आपल्या स्वातंत्र्य ची अनमोल किंमत सांगितली आहे. तेव्हा युवकांनी ही याच आपल्या स्वातंत्र्यवीराचा आदर्श समोर ठेवून आपला सर्वांगीण विकास करावा. आपल्या भारत देशाची एक खासियत म्हणजे आपण इतिहासापासून ते आजपर्यंत कधीही कुणावर आक्रमण केलेले नाही. परंतु जर शत्रू राष्ट्राने आपल्या देशावर वाकडी नजर टाकली तर त्यास जसेच्या तसे कठोर प्रतिउत्तर देण्याची परंपरा आपल्याला आहे. आणि हीच थोर परंपरा आपली पोलीस यंत्रणा व सीमेवरील वीर जवान आजही राबवत आहेत. आज वाढत्या जागतिकीकरणात जागतिक पातळीवर अनेक बिकट प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामध्ये कोरोना, वृक्ष संवर्धन,नैसर्गिक आपत्ती ,जागतिक दहशतवाद परराष्ट्र धोरण या विविध विषयांमध्ये आपला भारत देश जागतिक पातळीवर पुढे येऊन एक विश्वगुरू म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करीत आहे. याचा आपल्या सर्वांना एक सार्थ अभिमानच आहे. वाढते शहरीकरणाबरोबरच आपल्याला आदर्श असलेल्या ग्रामीण भागाचाही विकास आपण करायला हवा. त्यामध्ये आपल्या बळीराजाचा सर्वांगीण विकास आणि संकटवेळेला त्याला निस्वार्थपणे आणि भरभरून मदत करणे हे शासनाबरोबरच लोकप्रतिनिधींचेही कर्तव्य आहे. आपल्या शैक्षणिक पद्धतीत आज अमुलाग्र बदल करणे गरजेचे आहे. त्यामध्ये आज जागतिक स्तरावर आपल्याला भारत देशाला असलेला आदर्श इतिहास, आपली भारतीय संस्कृती, विज्ञान तंत्रज्ञान, आदर्श शिक्षण संस्था आणि महापुरुषांचे आदर्श विचार यांचा समावेश करून विद्यार्थ्यांचा परिपूर्ण व्यक्तिमत्व विकास करावा. यापूर्वी आपण अंतराळ संशोधन व शस्त्रात्र खरेदी प्रकरणात दुसऱ्या देशांवर अवलंबून होतो. परंतु आपल्या बुद्धीमान शास्त्रज्ञांनी आपली देश कर्तव्य समजून यामध्ये गरुड झेप घेतलेली आहे. व आज आपण आपल्या देशातच या सर्वांची निर्मिती करून एक स्वावलंबन राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करीत आहोत. पूर्वी ऑलम्पिक मध्ये आपल्या भारत देशाला नगन्य स्थान होते. परंतु आज विविध खेळाडू जागतिक स्तरावर उत्कृष्ट प्राविण्य आणि यशस्वी होऊन आपल्या भारत देशाचा गौरव करीत आहेत.आज जागतिक स्तरावरील बलाढ्य देशही आपल्या भारत देशाच्या इतिहासाचा आणि महापुरुषांचा आदर्श विचारांचा वारसा समोर ठेवून आपली रणरीती आखत आहेत. पूर्वीपासूनच आदर्श ग्रंथ अशी परंपरा असलेले रामायण व महाभारत यांच्या आजही तितक्याच भक्तीने पठण केले जाते. त्याचबरोबर विशेषता युवकांनी आपल्याला आदर्श असलेल्या राम सीता जोडीचा पवित्रआदर्श कायम ठेवावा. तेव्हा आजच्या युवक वर्गानेही आपल्या भारत मातेची शपथ घेऊन व्यसनांचे आणि भ्रष्टाचाराचे समूळ नष्ट करून स्वामी विवेकानंद यांच्या सारखे आदर्श जीवन चरित्र आणि घेऊन हातात हात येऊन एकत्र करू कामगिरी नेत्र दीपक. आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक विभिन्नता त्यामध्ये विविध राज्य व त्यांची प्रत्येकाची विविध संस्कृती विविध भाषा याची उज्वल परंपरा तेव्हा आपण सर्व नागरिकांनी आपापसात कुठलीही मतभेद न ठेवता भारत राष्ट्राचे नागरिक या विचारांनी एकत्र त्याचबरोबर दुष्काळ आणि दहशतवाद या आपल्या भारत देशाचा विकासात अडसर असलेल्या समस्यांचा युवकांनी तितक्याच ताकदीने पुढे येऊन बिमोड करावा.तेव्हा आजादी हक भी है अपना, अपनी जिम्मेदारी भी जागकर हमको करनी होगी इसकी पेहरेदारी भी . तेव्हा फार पूर्वीपासूनच आपल्या भारत देशाची आदर्श स्वराज्य आणि सुवर्ण राष्ट्र अशी असलेली आदर्श परंपरा आपण सर्वांनी कायम ठेवून आपले भारत देश उद्याचे बलशाली राष्ट्र बनवूया. भारत माता की जय भारत माता की जय. धन्यवाद.
लेखक.. कविराज अमोल मांढरे वाई जिल्हा सातारा.
Mobile no.7709246740…

error: Content is protected !!