शिवसेना प्रवक्ते मा.लक्ष्मण हाक्के यांचा कवठेमहांकाळ येथे सत्कार सोहळा संपन्न

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे) कवठेमहांकाळ येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नवनियुक्त प्रवक्ते लक्ष्मण सोपान हाक्के यांचा सत्कार यशवंत सेनेच्या महिला जिल्हाअध्यक्षा वैशाली दुधाळ यांच्या वतीने प्रा रामचंद्र दुधाळ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नुकतेच सांगोल्याचे शिवसेना बंडखोर आमदार शहाजी (बापू) पाटील यांना मोठा शह देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या प्रवक्तेपदी सांगोल्याचे लक्ष्मण सोपान हाक्के यांची निवड करण्यात आली होती.तदनंतर ते पहील्यांदाचा कवठेमहांकाळला आले होते.
यावेळी उस्फूर्तपणे त्यांचे स्वागत करण्यात आले.सौ वैशाली दुधाळ यांच्या निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात प्रा रामचंद्र दुधाळ यांच्या हस्ते हाक्के यांचा हार व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना लक्ष्मण हाक्के म्हणाले की गद्दार बाहेर पडल्याने आता खऱ्या अर्थाने शिवसेना स्वच्छ झाली असून आज विविध पक्ष संघटना व मंडळे हे अगदी उस्फुर्तपणे शिवसेनेला मिळत आहेत.शिवसैनिक ही पुन्हा एकदा अगदी मोठ्या जोमाने शिवसेना उभी करण्यासाठी कामाला लागले आहेत.त्याला जनतेतूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे.तेव्हा अगदी नजिकच्याच काळात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष मोठ्या राजकीय यशाच्या शिखरावर बसणार आसल्याचे सांगितले.लवकरच वैशाली दुधाळ यांना पक्षाच्या वतीने मोठी जबाबदारी दिली जाईल आसेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी स्वागत सौ वैशाली दुधाळ यांनी तर आभार प्रा रामचंद्र दुधाळ यांनी मानले.यावेळी ऑडव्हकेट ऋतुजा दुधाळ,ऋतीक दुधाळ,संदीप चव्हाण,नेहा निकम,अनिता शिंदेसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!