पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनचा अनोखा उपक्रम

नवचैतन्य टाईम्स सातारा प्रतिनिधी(प्रणाली कदम)क्रिकेट टूर्नामेंट मध्ये प्रथम क्रमांक साळोशी या संघाने पटकावला असून दुसरा क्रमांक मुनावले, तिसरा क्रमांक जाधव उंबरी तर चौथा क्रमांक सवरी या संघांनी विजय मिळवला:- पश्चिम जावलीतुन शुभेच्छाचा वर्षावपश्चिम जावलीतील मुलांनी एकत्र येऊन असोसिएशनची स्थापना करून ही संघटना निर्माण केली ही संघटना जावली विभागामध्ये गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, गरजू लोकांना आर्थिक मदत व लोकांना औषध उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर लागणारी मदत अश्या पध्दतीने जावळी विभागासाठी काम करत आहे. तसेच जावळी तालुक्यातील बामणोली परिसरातील लोक नोकरी धंद्यानिमित्ताने मुंबई येथे असतात, व यांना एकत्रीत ठेवण्याचे काम ही पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा हे करत आहेत, तसेच मुंबईसारख्या ठिकाणी पश्चिम जावलीतील मुलांनी एकत्र येऊन असोसिएशन मार्फत दोन दिवसीय क्रिकेट टूर्नामेंट दिनांक १२ व १३ नोव्हेंबर रोजी मुंबई सानपाडा येथे भरवण्यात आलेल्या होत्या. या ठिकाणी असोसिएशनचा भव्य-दिव्य उद्घाटन सोहळा पार पडला. या असोसिएशन मध्ये २४ संघाने सहभाग घेतला होता. हे सर्व २४ संघ या असोसिएशन मधील असून भविष्यात अजून संघ वाढवण्यात येणार आहेत.
ही दोन दिवसीय क्रिकेट टूर्नामेंट बाळू पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तसेच उपाध्यक्ष अनंत कोकरे, सचिव सागर शिंदे, उपसचिव विजय जाधव, खजिनदार बजरंग कीर्दत व उपखजिनदार पांडुरंग शिंदे आधी कमिटी सदस्य उपस्थित होते.
तसेच गरजवंतांना व सामाजिक कार्यात असोसिएशन नेहमी तत्परतेणे काम करेल, असे असोसिएशनचे अध्यक्ष बाळू पवार यांनी सांगितले,यावेळी पश्चिम जावली विभागातून बजरंग संकपाळ, सूर्यकांत शिंदे, राम शिंदे, नारायण शिंदे,संपत शिंदे,तसेच भागातील मान्यवर उपस्थित होते.तसेच या क्रिकेट टूर्नामेंट मध्ये प्रथम क्रमांक साळोशी या संघाने पटकावला असून दुसरा क्रमांक मुनावले व तिसरा क्रमांक जाधव उंबरी यांनी पटकावला असून मालिकवीर म्हणून सुनील भोसले मुनावले संघ, उत्कृष्ट फलंदाज संतोष चव्हाण सलोशी संघ,उत्कृष्ट गोलंदाज नितिन चव्हाण सलोशी संघ, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अनिल शिंदे, सावरी संघ असून यांचे पश्चिम जावली विभागातून कौतुक होत आहे,व पुढील वाटचालीसाठी जावली विभागातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!