घाटनांद्रे येथील सिध्दनाथ सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी निखिल शिंदे तर व्हा चेअरमनपदी सौ कांचन शिंदे अभिनंदनीय निवड

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)-घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ)येथील सिद्धनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी अपेक्षे प्रमाणेच निखिल नामदेव शिंदे यांची तर व्हाईस चेअरमनपदी सौ कांचन पांडुरंग शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाचे मुख्य लिपीक जी बी कुंभार यांनी तर त्यांना सहाय्यक म्हणून सचिव सयाजीराव गायकवाड यांनी काम पाहिले.
याबाबत अधिक माहिती अशी की नुकतीच सिद्धनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित घाटनांद्रे या संस्थेची निवडणूक माजी उपसभापती अनिल शिंदे व मावळते चेअरमन निखिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली होती.चेअरमन व व्हा चेअरमन निवडीसाठी सदर नवनिर्वाचित सदस्यांची बैठक नुकतीच पार पडली.यावेळी चेअरमनपदासाठी निखिल नामदेव शिंदे व व्हा चेअरमनपदासाठी सौ कांचन शिंदे यांचे एकमेव अर्ज आल्याने या निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले.यावेळी माजी उपसभापती अनिल (दादा) शिंदे,पांडुरंग शिंदे (गुरुजी),सिद्धनाथ सोसायटीचे उपाध्यक्ष पोपटराव पाटील,माणिकराव जाधवसह नवनिर्वाचित सदस्य सर्वश्री अनिल शिंदे,निखिल शिंदे,निहाल शिदे,उत्तम शिंदे,सुनिल शिंदे,भास्कर शिंदे,सौ कांचन शिंदे,श्रीमती मंगल शिंदे,सखाराम साळुंखे,अरुण पवार,संभाजी रास्ते,सचिव सयाजीराव गायकवाड,लिपीक अक्षय शिंदेसह सभासद,ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना नवनियुक्त चेअरमन व व्हा चेअरमन यानी सभासद व सदस्य यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल धन्यवाद देऊन,संस्था व सभासद यांच्या उत्कर्षासाठी सदैव कटीबद्ध आसल्याचे सांगितले. स्वागत सयाजीराव गायकवाड यांनी तर आभार अक्षय शिंदे यांनी मानले.

error: Content is protected !!