संत ज्ञानेश्वरांची यशोगाथा
🚩 नवचैतन्य टाईम्स ठाणे प्रतिनिधी(सचिन शिंदे)
🚩 *सार्थ ज्ञानेश्वरी*
💠 *अध्याय ११ वा*
🚩 *।विश्वरूपदर्शनयोगः।*
🚩 *ओवी ३९१ पासून*
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳
*🌺हें नव्हे मा रोकडें । सैंघ पसरूनियां तोंडें । कवळितासि चहूंकडे । सैन्यें इयें ॥३९१॥*
जिकडे तिकडे मुखे पसरून या दोन्ही सैन्याला चहूकडून आपल्या तोंडात टाकीत आहेस, हे स्पष्ट दिसत नाही काय?
➖➖➖➖➖➖➖➖
*_🍀अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपालसङ्घैः | भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथाऽसौ सहास्मदीयैरपि योधमुख्यैः ¦|२६|¦_*
अर्थ 👉 _हे धृतराष्ट्राचे पुत्र,राजांच्या समुदायांसह वर्तमान, भीष्म, द्रोण, तसाच कर्ण, त्याप्रमाणेच आमच्या पक्षाच्या देखील मुख्य योद्ध्यांसह_
➖➖➖➖➖➖➖➖
*🔔नोहेति? हे कौरवकुळींचे वीर । आंधळिया धृतराष्ट्राचे कुमर । हे गेले गेले सहपरिवार । तुझिया वदनीं ॥३९२॥*
हे कौरव कुळांतील वीर आणि आंधळ्या धृतराष्ट्राचे पुत्र नव्हेत काय? हे सर्व आपल्या परिवारासह तुझ्या मुखांत शिरलेत.
*🌺आणि जे जे यांचेनि सावायें । आले देशोदेशींचे राये । तयांचें सांगावया जावों न लाहे । ऐसें सरकटित आहासी ॥३९३॥*
आणि युध्दात यांचे सहाय्य करण्याकरिता इतर देशींचे जे जे राजे आले आहेत, त्यांची मृत्युवार्ता सांगायलाही कोणी उरणार नाही. अशा रीतीने सरसकट सर्वांना गिळीत आहेस.
*🌺मदमुखाचिया संघटा । घेत आहासि घटघटां । आरणीं हन थाटा । देतासि मिठी ॥३९४॥*
मदोन्मत्त हत्तींच्या समुदायांना तोंडात घटघट ओतीत आहेस व त्याचप्रमाणे युध्दात थाटलेल्या संपूर्ण सैन्यरचनेला मिठी मारत आहेस.
*🌺जंत्रावरिचील मार । पदातींचे मोगर । मुखाआंत भार । हारपताति मा ॥३९५॥*
तोफादिक यंत्राचा मारा करणारे व पायदळांचे मुख्य यांच्या झुंडीच्या झुंडी तुझ्या मुखांत गडप होत आहेत ना?
*🌺कृतांताचिया जावळी । जें एकचि विश्वातें गिळी । तियें कोटीवरी सगळीं । गिळितासि शस्त्रें ॥३९६॥*
एकच शस्त्र संपूर्ण विश्वाचा संहार करते व म्हणून मृत्यूचे भावंड होय, अशी कोट्यावधी शस्त्रे तू गिळीत आहेस.
*🌺चतुरंगा परिवारा । संजोडियां रहंवरां । दांत न लाविसी मा परमेश्वरा । कसा तुष्टलासि बरवा॥३९७॥*
हत्ती, घोडे, रथ, पायदळ अशा चतुरंग सेनेचा संपूर्ण परिवार व घोडे जोडलेले रथ यांना भगवंता! कसा प्रसन्न झाला आहेस पहा की, यांना तू दात लागू न देता गिळून टाकीत आहेस.
*🌺हां गा भीष्मा{ऐ}सा कवणु । सत्यशौर्यनिपुणु । तोही आणि ब्राह्मण द्रोणु । ग्रासिलासि कटकटा॥३९८॥*
देवा! भीष्माचार्यासारखा सत्यवचनी व शौर्यात निपुण असा कोण आहे? पण अरेरे! त्याला व द्रोणाचार्यासारख्या ब्राह्मणालाही ग्रासून टाकलेस.
*🌺अहा सहस्रकराचा कुमरु । एथ गेला गेला कर्णवीरु । आणि आमुचिया आघवयांचा केरु । फेडिला देखें|३९९|*
हाय! हाय! सूर्यपुत्र जो महायोध्दा कर्ण, तोही तुझ्या मुखात गेला आणि आमच्या बाजूचे सर्व योद्धे तर केरासारखे नाहीसे केलेस,असे मी पाहत आहे.
*🌺कटकटा धातया । कैसें जाहलें अनुग्रहा यया । मियां प्रार्थूनि जगा बापुडिया । आणिलें मरण ॥४००॥*
अरेरे ब्रह्मदेवा! विश्वरूप दर्शनाचा अनुग्रह कसा फळला पहा! मी विश्वरूपदर्शनाकरिता भगवंताची प्रार्थना करून बिचार्या जगावर मरणाचा प्रसंगआणला.
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳
🚩 *_ओवी४०१ पासून उद्या_*
🚩 *_जयजय रामकृष्णहरि_*