संत ज्ञानेश्वची यशोगाथा

नवचैतन्य टाईम्स ठाणे प्रतिनिधी सचिन शिंदे
🔥 *_सार्थ ज्ञानेश्वरी_*
💠 *_अकरावा अध्याय_*
🔥 *_ओवी ४४१ पासून_*
🔥 *_विश्वरूपदर्शनयोग_*
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳

*_🚩अगा आत्मा तूं एकु । सकळ विश्वव्यापकु । तरी कां आम्हां अंतकु । तैसा वोडवलासी ? ॥४४१॥_*
    अहो देवा! तू सर्व ब्रह्मांडाचा एक अंतरात्मा असून सर्व जगतात भरलेला आहेस, मग आम्हासाठी का असा प्राण घेणारा मृत्यु झालास?
*_🚩तरी मियां सांडिली जीवित्वाची चाड । आणि तुवांही न धरावी भीड । मनीं आहे तें उघड । बोल पां सुखें ॥४४२॥_*
    तरी मी जिवंत राहण्याची आशा सोडली आहे. आणखी तूही काही संकोच करू नकोस. तुझ्या मनात जे काही असेल ते स्पष्ट सांग.
*_🚩किती वाढविसी या उग्ररूपा । आंगींचें भगवंतपण आठवीं बापा । नाहीं तरी कृपा । मजपुरती पाही॥४४३॥_*
  आता या आपल्या रूपाचा भयंकरपणा किती वाढवितोस? तुझ्या स्वतःच्या अंगी असलेल्या भगवंतपणाचे स्मरण ठेव. नाही तर माझ्यापुरती तरी कृपा कर.
➖➖➖➖🚩➖➖➖
*_🌺आख्याहि मे को भवानुग्ररूपो नमोऽस्तु ते देववर प्रसीद ।विज्ञातुमिच्छामिभवन्तमाद्यं न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम् ॥३१॥_*
अर्थ 👉  _हे उग्र रूप धारण केलेला तू कोण आहेस मला सांग. हे देवश्रेष्ठा मी तुला नमस्कार करतो. माझ्यावर अनुग्रह कर. अगोदर मी तुला पूर्णत्वाने जाणण्याची इच्छा करीत आहे, कारण तुझी ही प्रवृत्ती मला समजत नाही_
➖➖➖➖🚩➖➖➖
*_🚩तरी एक वेळ वेदवेद्या । जी त्रिभुवनैक आद्या । विनवणी विश्ववंद्या । आइकें माझी ॥ ४४४ ॥_*
     वेदानेच जाणला जाणार्‍या, त्रैलोक्याच्या मूळ कारणा व त्रैलोक्याला पूज्य अशा भगवंता! एक वेळ माझी प्रार्थना ऐक.
*_🚩ऐसें बोलोनि वीरें । चरण नमस्कारिलें शिरें । मग म्हणें तरी सर्वेश्वरें । अवधारिजो ॥ ४४५ ॥_*
    असे बोलून, त्या श्रेष्ठ अर्जुनाने भगवंताच्या पायावर मस्तक ठेवले व म्हणाला, हे सर्वेश्वरा ! ऐक
*_🚩मियां होआवया समाधान । जी पुसिलें विश्वरूपध्यान । आणि एकेंचि काळें त्रिभुवन । गिळितुचि उठिलासी ॥४४६॥_*
     माझे समाधान व्हावे म्हणून मी तुला विश्वरूप दाखविण्याची प्रार्थना केली आणि तू तात्काळ संपूर्ण ब्रह्मांड गिळितच प्रगट झालास.
*_🚩तरी तूं कोण कां येतुलीं  । इयें भ्यासुरें मुखें कां मेळविलीं  | आघवियाचि करीं परिजिलीं । शस्त्रें कांह्या ॥४४७॥_*
     तरी तू कोण आहेस?अशी एवढी मुखे कशाकरिता घेतलीस? व संपूर्ण हातामध्ये परजलेली शस्त्रे कशाला धारण केलीस?
*_🚩जी जंव तंव रागीटपणें । वाढोनि गगना आणितोसि उणें । कां डोळे करूनि भिंगुळवाणे । भेडसावीत आहासी॥४४८॥_*
    आणि देवा! जेव्हा तेव्हा कृध्दपणाने वाढून आकाशाला का मागे टाकतोस आणि अत्यंत लाल डोळे वटारून आम्हाला का भीती दाखवितोस?
*_🚩एथ कृतांतेंसि देवा ।कासया किजतसे हेवा । हा आपुला तुवां सांगावा ।अभिप्राय मज ॥४४९॥_*
     देवा! या ठिकाणी महामृत्यूशी तू कशाला स्पर्धा करीत आहेस? असे करण्यात तुझ्या मनातील हेतू काय आहे, तो मला सांग.
*_🚩या बोला म्हणे अनंतु । मी कोण हें आहासी पुसतु । आणि कायिसयालागीं असे वाढतु । उग्रतेसी ॥४५०॥_*
      हे अर्जुनाचे म्हणणे ऐकून, भगवंत म्हणतात, मी कोण आहे व आपले एवढे उग्र स्वरूप का वाढवित आहे, हेच तू विचारीत आहेस.
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳
🌹 *_॥ जयजय रामकृष्णहरि ॥_*
🌿 *_ओवी ४५१ पासून उद्या_*

error: Content is protected !!