भुतावळ
नवचैतन्य टाईम्स वाई प्रतिनिधी(प्रा.संभाजी लावंड)विष्णुपंत सातारकराच्या विहीरीत नेहमी गडद धुक्यासारखा अंधार होत असायचा.त्या गडद
अंधारात टकुचीवाली लहान मुले एका पाठो पाठ एक उड्या मारत असल्याचे आवाज व अमावस्या पौर्णिमेला ऐकु यायचे.दाट आंब्याच्या परिसरातील एकाकी पणा येणाऱ्या व जाणाऱ्यां वाट सरुंच्या हृदयात भितीची कळ धडकी निर्माण करायचा.हिरव्या आकडेबाज मिरच्यांचे मोठाले वाफे,वांग्याची कमरे पर्यंत माजलेली झुडपे,लसणीच्या कडेने लावलेल्या काटेरी कुंपणावरती लगडलेल्या पावट्याच्या टचटचीत फुगीर,लुसलुशीत ओल्याकच शेंगांचे झुबके अधांतरी लोंबकळत होते.आणि गाजराचा वाफा नुसता उतु चालला होता.घोसाळी,कारली,दोडके,दुधी भोपळे,व डांगळ्यांचे वेल सापासारखे वाऱ्यावर वळ वळत होते.तेथील ज्वारीच्या परिपक्व हिरव्यागार कणसांवर पक्षी सुध्दा बसत नव्हते. तेथील वस्तुंची चोरी करणाराला टकुची वाली भुतावळ चोहो बाजूंनी घेरुन खेळवुन आडवुन हाता पायाला,काखेत व पोटाला गुदगुल्या करुन घोळसायची. माळव्याला नुसता हात लावला तरी ती भुतावळ क्षणात जागी व्हायची.या टापुत उदबत्ती सारखी धुरांची वलये झाडावरती लगेच उगवायची. घाणेरीच्या झुडपांचे गचपण दिवसे न दिवस बेमालुपणे विहिरीच्या तोंडाशी वाढले होते. विहिरीच्या आसपास पसरलेल्या दगरटीतुन व कमरे एवढ्या वाढलेल्या गांधील गवता तुन विषारी सापाच्या पांढऱ्या शुभ्र कांतनी वाऱ्यावर भुरभुरायच्या.एकटा दुकटा माणूस तेथे जाणे अशक्य होते.लाल गोंड्यांची टकुची घातलेली लहान बिटी बिटी भुते झाडांच्या फांदीवर अंधातरी बसुन झोके घ्यायची.कधीफांदीला लोंबकळत परिसराची राखण करीत बसायची.असल्या एकांगी निर्जन व भितीदायक शिवारात नारायण सातारकरांचा घोडा मोठ्याने खिदळायचा व फुरफुरा यचा.घोड्यांच्या खिदळल्यामुळे तेथील पिशाच्चे घाबरुन मुळ स्वरु पात अदृश्य होत होती.एकदा काय झालं विलास माळ्याचे शिवराम म्हातारं कांता मानेंच्या माळात पाच सहा गुरे राखत असतानाअचानक झोप लागली. आणि सगळी गुरे सातारकरांच्या शिवारात जाऊन पोहचली.कांता माने यांच्या आंब्याखाली झोपले ल्या शिवराम म्हाताऱ्याला अचा नक जाग आली हातात काठी घेऊन पळतच गुरांमागे सरकारी पाट ओलांडून ओघळीत उतरले. तो पर्यंत सगळी गुरे स्वभाव धर्मानुसार हिरव्यागार गवतावर तुटुन पडली होती.भुतांच्या राज्यात एक नियम कायम असतो.तो म्हणजे कोणत्याही प्राण्याला ते त्रास देत नाहीत. म्हाताऱ्याने लगोलग सर्व गुरे बाजुला हटवली.आणि माघारी फिरताना त्यांचे लक्ष ओल्याकच मिरच्या,वांगी,पावटे,दोडके,काकडी,कांदे,गाजरे,घोसाळी यावर पडले आणि मनात मोह निर्माण झाला.म्हातारा लगोलग वाफ्यात उतरला.प्रथम वांगी तोडुन त्यानी धोतऱ्याच्या सोग्यात साठवु लागला.त्यानंतर नेहरु शर्टाच्या दोन्ही बाजुच्या खिशात भरु लागला,तोच कानावर मुलांचा गलका ऐकू आला,”ए आर,बास कर की”! म्हातारा आसपास चौफेर पाहायला लागला. तोच त्यांची नजर आंब्याच्या मोठ्या घनदाट फांदीवर गेली आणि म्हाताऱ्याची पाचावर धारण बसली. लाल गोंडे हलवत टकुचीवाली भुतांची झुंड फांदीवर वेड्या वाकड्या माना करुन गारगोटी सारख्या बुबुळे नसलेल्या पांढऱ्या शुभ्र डोळ्यातील खाचांनी टुकुमुकु टुकुमुकू पहात होती.मुखातील पांढरे शुभ्र अचकट विचकत दात दाखवत गुरगुरत खेकसत म्हाताऱ्याच्या अंगावर एकाएकी धाऊन धाऊन येत होती. खावू का गिळु या गुर्मीत खुनशी नजरेने ड़ोळे वटारुन उलट्या सुलट्या उड्या हाणुन समोरच गुप्त व प्रकट होत होती.भितीने त्यांच्या धोतराचा सोगा सुटुन वांगी जमिनीवर पडली,नाही तोच सगळी भुतावळ वाफ्यात अर्ध्या क्षणात टणाटण चेंडु सारख्या उड्या मारत शिवराम मामांना वाफ्यातच आडवा करुन ओरबडुन घोळसायला लागली. त्यातील चार भुतांनी म्हाताऱ्याच्या पाय तळव्यांना बोटांनी खाजवायला व ओरबाडा यला सुरुवात केली.दोन भुते काखेत व छातीवर बसुन गुद गुल्या करु लागली. बाकीची पोटावर,नाका व तोंडावर चढुन बसली होती.ही झटापट उलट, सुलट,या बाजुने तर कधी त्या अंगाने घडायची. फेरफटका मारायला गेलेले नारायण सातारकर अचानक सहजगत्या खग्याच्या शिवारातुन घोड्यावर बसुन रानमाळातील वाटेने , फुफाट्यातुन धुरळा उडवीत विहिरीच्या बाजुने येताच अचानक घोडा मागील दोन पायांवर उभे राहुन मोठं मोठ्या आवाजाने किंचाळायला व फुरफुरायला लागला.तो किंचाळण्याचा आवाज परिसरात पोहचताच टकुचीवाल्या भुतावळींनी एका मागे एक विहिरीत धडाधड उड्या टाकून तळात अदृश्य झाली होती.उंचावरुन ढकलुन दिल्यासारखा शिवराम मामा शेजारील वगळीत घरंगळत जाऊन उताणे पडले होते.नारायण सातारकरांनी आपला घोडा करंजाच्या झुडपाला बांधुन वरंगळ चढुन विहिरीजवळ येताच कोणीतरी कण्हत असल्याचा आवाज कानावर येऊ लागला. वाफ्यात पडलेली वांगी, डोकीचा पांढरा पटका, अस्ता व्यस्त पडलेल्या चपला पाहुन,ते वगळीत उतरले व म्हाताऱ्याची अवस्था पाहून ते मनात चरकले. घोडा बांधलेल्या अवस्थेत तसाच ठेवून,नारायण सातारकरांनी म्हाताऱ्याला कसे तरी उचलून पाठकुळीवर घेतले.गोरख माने यांच्या शिवारातुन,रावजी बुवांच्या थड्या जवळुन गोठी आंब्या खालुन मुजावर आळीतुन राधा दळवींनीच्या परड्यातुन अब्बास भाईंच्या शेजारी विलास माळी यांच्या अंगणात कसे तरी आणुन सोडले.तो पर्यंत सवयी नुसार सगळी गुरे गोठ्यात आली होती. मामी व विलास म्हाताऱ्याला उशीर का झाला म्हणून अंगणात चिंता ग्रस्त होऊन सारखी वाट पहात होती.नारायण सातारकरां नी विहीरी जवळ घडलेली अवस्था सांगुन ते माघारी रानात निघाले. सायंकाळी जेवण खाण झाल्यावर म्हाताऱ्याच्या अंगात सणकुन ताप भरला.रात्री अप रात्री म्हाताऱ्याला टकुची वाली भुते उड्या मारताना दिसायची. आणि अजिबात झोपुन द्यायची नाहीत.ती सगळी फौज वाकळत शिरुन हातापायाला व पोटाला ओरबाडायची.म्हातारा कळकाच्या काठीने उंबऱ्यावर, चुलीवर, तुळ ईवर अंगणात,व म्हैशीच्या दावणीत दिसत असलेल्या टकुचीवाल्या मुलांना मारीत सुटायचा. मामी व विलास दादा त्यांना आवरत होते. मात्र काठीचे तडाखे जमिनीवर सतत पडत होते. रात्रभर हाच उद्योग सुरु होता. दिवस भर शिवराम मामा झोपुन असायचे.संध्या काळी पाच वाजण्याच्या सुमारास दिलावर, कुमार, व मी अंगणात चेंडू खेळत असायचो.त्याच वेळी म्हातारं घरातील चिंध्या गोळा करुन गुडघ्यापासुन खाली दोन्ही पायांना गुंडाळून बांधत बसलेले असायचे.शेजारील चंगुबुबुं राहुन राहुन सतत विचारायची की, “मामा पायांना चिंध्या कशाला बांधताय”? तेव्हा शिवराम मामा म्हणायचे ,”अग,चंगु बुबु तुला काय सांगु,”टकुचीवाली हरामखोर पोरं पायाला बघ सारखी गुदगुल्या करत्याती” !आम्हा पोरांना ते खरं वाटत नव्हतं.पण म्हातारा सातार करांच्या विहीरीवर गेला होताअसे समजले.की,आमच्या सहीत ऐक णारी माणसे घाबरायची. एका अमावस्येच्या उत्तररात्री त्यांचा अचानक मृत्यू झाला.आणि अखेर टकुच्यावाल्या भुतांनी
आपला डाव साधला. म्हाता ऱ्याचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी थोराड शरिराचे गोरख माने यांनी रेवाप्पांच्या दुकानाला वळसा घालून, भानु जाधवांच्या बोळातुन विलास माळी यांच्या अंगणात पायताणाचा आवाज करीत उत रले. म्हाताऱ्याची झालेली गत पाहुन ते सुध्दा मनात चांगलेच टरकले होते.माघारी फिरताना दादांना पाहुन तेअंगणात थांबले. दादां (रामा कुसा)आणि गोरख माने या दोघांची सोप्यातील घोंग ड्यावरच बैठक बसली.आईने गुळाचा चहा बनवलेला मंगल ने आणुन दिला.चहाचे घोट घेत घेत अत्यंत दबक्या आवाजात गोरख माने सांगत होते, “रामभाऊ”, तुम्ही काहीही म्हणा,पण सातार करांच्या शिवारात टकुची वाली भुतावळ हायती हे खरं आहे!” एकदा मी भुतावळीच्या तावडीतून कसा बसा वाचलो.”पर नेमकं झालं तरी काय”रामभाऊ म्हणाले. आणि आणि गोरख माने सांगु लागले.आम्ही मुलांंनी सोप्यातच कोंडाळे करुन कान देऊन ऐकु लागलो.त्याच असं झालं याच वर्षी नारगवंडीतल्या वरच्या वावरात बाभळीच्या झाडाखाली ज्वारीच्या कणसाचे शेजर कमरे च्यावर गेले होते.शेजारीच मध्य भागी तिवडा रोवलेल मोकळं खळ चांदण्यात हरवल्या सारखे वाटत होते.खळ्याच्या समोरच भली मोठी कोप कडब्याने व भातव्यानाच्या चघाळांनी शाकार लेली होती.रात्रीचे साडे अकरा वाजले असतील बघा. साऱ्या शिवारात टिपुर शुभ्र चांदणे पडले होते.रात्र ही वाढत चालली होती. आकाशात चंद्र स्वतंत्र राज्य करीत होता.आणि चांदण्यांनी आकाशाला झाकुन टाकले होते. सर्वत्र फक्त नि:शब्द शांतता मनाला पोराला लागली. होती. लदाड्या आंब्यावर एकदम दोन तीन घुबडाच्या आवाजाची कच कच शिजत होती.व घुमणे सुरु झाले.तो आवाजाची कळ साऱ्या शिवारभर पसरत गेली.गोठी आंब्यावर देखील तसलीच कचकच व घुमणे एकाएकी सुरु झाले.कणसाच्या शेजऱ्यावर नुसता पडुन होतो. भुका लागल्या नंतर घरुन बांधुन आणलेली भाकरीची चवड व तवलीतील आमटी पितळी ताटात ओतुन घेतली.आणि कोपी समोरच जेवायला बसलो.बाहेर निरव शांत ता नांदत होती.चांदण्यात लांबवरचा परिसर अगदी स्पष्ट दिसत होता.वाऱ्याची झुळूक अधुन मधुन वावरातील कडप्यांना चाटुन जात होती.त्यामुळे वाळलेल्या पानांची एकसारखी सळसळ वाढायची.रात किड्यांची किरकिर वाढतच होती. सातार करांच्या वस्ती वरुन बरीच माणसे एकमेकांशी खेकसुन बोलत असल्याचे आवाज वाऱ्यावर तरंगत होते.ते मला ही ऐकु आले होते.जेवणखान झाल्या नंतर पाणी पिऊन मी कोपीच्या बाहेर चांदण्यात येर झाऱ्या घालु लागलो.पण आता मघाचा गलगा एकाएकी येण्याचे बंद झाला होता.मला वाटलं पंतांच्या खळ्यात ज्वारीची मळणी सुरु केली असेल.शिवाय पोटात अन्न गेल्यामुळे मला लवकर झोपही लागत नव्हती.उभ्या उभ्या पायात चपल्या सरकवल्या .बटव्यातल्या तंबाखूला अंगठ्याने चुना लावत व हातावर मळत विष्णूपंतांच्या शेतातील खळ्याकडे तोंड करुन निघालो.लक्ष्मण तात्यांच,हिंदुराव फौजींच,नवा वाड्यातील गुलाब आप्पा,आणि गोरखबुवाच्या वावरातुन थेट विष्णुपंताच्या वावरात पाय ठेवला.आता पंताच खळ फक्त अर्धा कासराभरच राहिलं होत. खळ्यात पांढऱ्या शुभ्र दाण्याची रास लांबुनच दिसत होती.त्या राशी शेजारी खळ्यातच तीन पायावर उभी असलेली लाकडी वावडी, व काही काही टोपल्या पडलेल्या दिसत होत्या. मी तेथे अहो विष्णुपंत!अहो विष्णुपंत!अशा हाका मारत कोपी जवळ गेलो तर आत कोणी ही नव्हते.मग अर्ध्या तासापुर्वी बोलण्याचा व खेकसण्याचा
आवाज कुणाचा येत होता.असा प्रश्न माझ्या मनात येताच.माझे लक्ष वावडीवर गेले. आणि “काय सांगु रामभाऊ” माझ्या काळजाचं पाणी पाणी झाल”! आणि पोटात एकदम धस्स झाले.कारण
समोरच्या लाकडी तीन पायांच्या वावडी लहान लहान टकुचीवाली पोर दाटीवाटीने एकमेकांना खेटून बसली होती.त्यांची उंची ही वानराच्या वीतभर लहान पिल्ला एवढी होती.त्यांचे लक्ष माझ्यावर व माझे लक्ष त्यांच्याकडे गेले. आमची दृष्टी एक झाली.आणि ती भुतावळ जागी होऊ पहात होती. आपणाला पकडणार व घोळसणार असे वाटले व सर्वां गाला दरदरुन घाम सुटला. जीवाच्या आकांताने धावत पळत माघारी फिरलो.आणि सातारकरांच्या शेताचा बांधावरुन गोरख बुवांच्या वावरात उंच उडी मारली.आणि आपल्या वस्तीवर गपगुमान आलो.वळुन मागे
सुध्दा बघितले नाही.मी शेजऱ्या वर झोपलो पण झोप लागत नव्हती.ती रात्र मी जागुन काढली.तरी ही रात्री तीन वाजता पंतांच्या खळ्यावरुन एकमेकांशी कोणी तरी खेकसत असल्याचे आवाज यायला लागले.ही घटना गोरख माने आमच्या सोप्यात बसुन सांगत असताना गोसावी बापु झोळी घेऊन अल्लख गाजवुन ज्वारीचे पीठ मागत आमच्या घरासमोर आले.गोसावी बापुचे दर्शन सर्वांनी घेतले व गोरख माने पाया पडताना खुप घाबरलेले दिसले. गोसावी बापुंना दैवी शक्ती प्राप्तअसल्याने त्यांनी गोरख माने यांची स्थिती ओळखली.आणि म्हणाले ,”तुम्ही थोडक्यात वाचलेला आहात. कारण तुम्ही खळ्यावरील कोण त्याही वस्तुला हात लावलेला नाही.आता निर्भय रहा असे म्हणुन बापुंनी आम्हा सर्वांना झोळीतील विभुती लावली. व ते पुढच्या दारी निघुन गेले.आम्ही ही बाहेर खेळायला उधळलो.दादा व गोरख माने बोलत बोलत जगदाळे यांच्या बोळातुन चावडीकडे निघाले होते.
प्रा.श्री.संभाजी लावंड वाई