संत ज्ञानेश्वरांची यशोगाथा

नवचैतन्य टाईम्स ठाणे प्रतिनिधी(सचिन शिंदे)
🚩 *सार्थ ज्ञानेश्वरी*
🚩 *अध्याय ११ वा*
🚩 *।विश्वरूपदर्शनयोगः।*
🚩 *ओवी ४८१ पासून*
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳

*_💧ऐसिया इया गोष्टी ।विश्वाच्या वाक्पटीं ।लिहूनि घाली किरीटी ।जगामाजीं ॥४८१॥_*
      अशा प्रकारच्या गोष्टी जगामध्ये सर्व लोकांच्या मुखरूपी पटावर, अर्जुना! तू लिहून ठेव-म्हणजे सर्व लोकांच्या तोंडी होऊ दे व विजयी हो.
➖➖➖➖🚩➖➖➖
*_🔥संजय उवाच । एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी ॥नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीतभीतः प्रणम्य ॥ ३५॥_*
अर्थ. 👉  _संजय म्हणाला, श्रीकृष्णाचे हे भाषण ऐकून भयाने कापत असलेला व हात जोडलेला अर्जुन भयभीत होत्साता साष्टांग नमस्कार घालून पुन्हा श्रीकृष्णाला सगद्गदित वाणीने म्हणाला_
➖➖➖➖🚩➖➖➖
*_💧ऐसी आघवीचि हे कथा ।तया अपूर्ण मनोरथा ।संजयो सांगे कुरुनाथा ।ज्ञानदेवो म्हणे ॥ ४८२ ॥_*
     श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे संपूर्ण वर्तमान ज्याचे मनोरथ पूर्ण झाले नाहीत, अशा कुरुराज धृतराष्ट्राला संजय सांगू लागला.
*_💧मग सत्यलोकौनि गंगाजळ ।सुटलिया वाजत खळाळ ।तैशी वाचा विशाळ ।बोलतां तया ॥ ४८३ ॥_*
     मग ज्याप्रमाणे सत्यलोकापासून उगम पावलेल्या गंगाजळाचा खळाळ वाजतो, तशी अर्जुनाशी बोलताना भगवंताची वाणी गंभीर होती.
*_💧नातरी महामेघांचे उमाळे ।घडघडीत एके वेळे ।कां घुमघुमिला मंदराचळें ।क्षीराब्धी जैसा ॥ ४८४ ॥_*
     किंवा आकाशात महामेघाचे उमाळे उठले असता एकदम घडघड असा आवाज होतो किंवा क्षीरसमुद्राच्या मंथनाचे वेळी मंदराचलाच्या मंथनाचा आवाज घुमू लागला.
*_💧तैसें गंभीरें महानादें ।हें वाक्य विश्वकंदें ।बोलिलें अगाधें ।अनंतरूपें ॥ ४८५ ॥_*
     त्याप्रमाणे विश्वरूप धारण करणार्‍या व विश्वांचे कारण असणार्‍या अगाध भगवंताने गंभीर व थोर नाद करणार्‍या वाणीने हे वाक्य उच्चारिले.
*_💧तें अर्जुनें मोटकें ऐकिलें ।आणि सुख कीं भय दुणावलें ।हें नेणों परि कांपिन्नलें ।सर्वांग तयाचें ॥४८६॥_*
     तें वाक्य अर्जुनाने केवळ ऐकले मात्र आणि त्याच्या मनात सुख झाले की भीती दुप्पट वाढली. हे आम्ही जाणत नाही; पण त्याचे सर्वांग मात्र कापू लागले.
*_💧सखोलपणें वळली मोट ।आणि तैसेचि जोडले करसंपुट ।वेळोवेळां ललाट ।चरणीं ठेवी ॥४८७॥_*
    त्याचा शब्द खोल जाऊन मुरकुंडी वळली व तशा स्थितीतच त्याने हात जोडले व वारंवार चरणावर मस्तक ठेऊ लागला.
*_💧तेवींचि कांहीं बोलों जाये ।तंव गळा बुजालाचि ठाये ।हें सुख कीं भय होये ।हें विचारा तुम्हीं ॥ ४८८ ॥_*
    त्याचप्रमाणे काही बोलण्याचा प्रयत्न करू लागता त्याचा कंठ भरून येई. हे सुखाचे लक्षण आहे की भीतीचे लक्षण होय याचा तुम्हीच विचार करा.
*_💧परि तेव्हां देवाचेनि बोलें ।अर्जुना हें ऐसें जाहलें ।मियां पदांवरूनि देखिलें ।श्लोकींचिया ॥४८९॥_*
    पण तेव्हा देवाच्या बोलण्याने अर्जुनाची अशी स्थिती झाली की श्लोकांतील पदांवरून मी जाणली आहे.
*_💧मग तैसाचि भेणभेण ।पुढती जोहारूनि चरण ।मग म्हणे जी आपण।ऐसें बोलिलेती ॥४९०॥_*
     मग तसाच भीत भीत पुनः भगवंताच्या चरणांना नमस्कार करून अर्जुन म्हणतो, अहो जी भगवंता!आपण असे बोललात.
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳
🚩 *_॥जय जय रामकृष्णहरि॥_*
🚩 *_ओवी ४९१ पासून उद्या_*

error: Content is protected !!