इंडियन रिपोर्टर असोसिएशन महाराष्ट्र राज्य महिला विंगच्या अध्यक्षपदी कामिनी पाटील यांची फेरनिवड

नवचैतन्य टाईम्स सांगली(प्रतिनिधी)-इंडियन रिपोर्टर असोसिएशन नवी दिल्लीच्या महाराष्ट्र राज्य महिला विंग अध्यक्ष म्हणून कामिनी पाटील यांची फेरनिवड करण्यात आली. कामिनी पाटील या गेली 20 वर्ष साप्ताहिक सातारा वार्ता या अंकाचे नियमित प्रकाशन करीत असून त्या विविध संस्थांवर कार्यरत आहेत. त्यांना आज पर्यंत राज्यातील अनेक पुरस्कार मिळाले असून त्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे. बऱ्याचश्या सामाजिक उपक्रमामध्ये त्या नेहमी सक्रिय असतात. सातारा जिल्ह्यातील अनेक महिलांचे प्रश्न त्यांनी सोडविले असून राज्यस्तरावर पत्रकारांच्या हितार्थ कार्यरत आहे. अशा या सामाजिक कार्यकर्त्याची दखल घेऊन इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन नवी दिल्ली या आंतरराष्ट्रीय संघटनेवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व म्हणून महिलांच्या विंगच्या अध्यक्ष म्हणून फेर निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे इंडियन रिपोर्टर असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखेच्या वतीने कामिनी पाटील यांचे अभिनंदन व त्यांच्या पुढील कार्यास नवचैतन्य टाईम्स परिवार यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा

error: Content is protected !!