गुंठेवारी खरेदी-विक्री वरील बंदी हटवा अन्यथा उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेने कडून तीव्र आंदोलन छेडू-सागर पाटील
नवचैतन्य टाईम्स जत प्रतिनिधी(नजीरभाई चट्टरकी) महाराष्ट्र शासनाकडून बंदी घालण्यात आलेल्या गुंठेवारी जमीन खरेदी-विक्री व्यवहारातील बंदी हटवून तात्काळ खरेदी-विक्री सुरू करण्यात यावी या मागणी चे निवेदन “उद्धव बाळासाहेब ठाकरे ” शिवसेनेचे सांगली जिल्हा उपप्रमुख माननीय सागर पाटील यांनी जत दुय्यम निबंधक श्रेणी-एक या कार्यालयाचे अधिकारी श्री.राहूल हांगे यांना दिले.
यावेळी शिवसेनेचे तालुका उपप्रमुख शिवाजीराव पडोळकर विश्वनाथ सरगर व सिद्धनाथ शेतकरी संघटनेचे नेते अण्णाप्पा बिळूर हे उपस्थित होते तर सेनेचे तालुका संघटक अमित उर्फ बंटी दुधाळ यांनी प्रस्तुत निवेदनावर सह्या केल्या…
राज्य भर गुंठेवारी खरेदी-विक्री वर विनाकारण अनावश्यक बंदी घातल्यामुळे शासनाच्या तिजोरी वर सुध्दा याचे विपरीत परिणाम झालेली आहेत.उलट शासनाचेच मोठे नुकसान झाले आहे.. गेल्या वर्ष- दीड वर्षापासून शहर व तालुक्यातील गुंठेवारी खरेदी विक्री व्यवहारावर ठप्प झाली आहेत.शासनाच्या या चुकीच्या धोरणामुळे गोरगरीब व अल्पभूधारक यांची मुस्कटदाबी होत असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान ही होत आहे. यातूनही गुंठा दोन गुंठे जमीन खरेदी करायची झाल्यास नियमितीकरण व बाजारभावाच्या २५ महसूल शासनास भरावे लागते मग खरेदी विक्रीस परवानगी मिळते ही प्रक्रिया अत्यंत खर्चिक डोकेदुखीची असून बिलकुल परवडणारी नाहीये संतप्त शिवसेने कडून देण्यात आलेल्या निवेदनाचा वरिष्ठ पातळीवर विचार करून खरेदी विक्री व्यवहार पूर्वीप्रमाणे तात्काळ सुरू करण्यात यावेत अन्यथा रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा श्री सागर पाटील यांनी दिला आहे.लवकरच जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळ घेऊन भेटून निवेदन देण्यात येणार असल्याचे श्री. सागर पाटील यांनी नवचैतन्य टाईम्स शी बोलतांना सांगितले.